मालकाला पाहताच पोपट म्हणाला, "मम्मी-पप्पा"; पोलिसांनी काही क्षणात निर्णय देऊन टाकला!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 09:31 PM2022-12-19T21:31:14+5:302022-12-19T21:54:08+5:30
उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक वेगळचं प्रकरण समोर आले आहे.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक वेगळचं प्रकरण समोर आले आहे. पोलीस ठाण्यात परदेशी पोपटाच्या मालकीवरून दोन पक्षांमध्ये पंचायत झाली. तासभर चाललेल्या या पंचायतीनंतर पोलिसांनी निकाल देत परदेशी जातीचा पोपट कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. यानंतर त्या कुटुंबाच्या मोठ्या प्रमाणात आनंद झाला.
सदर दोन कुटुंबीयांनी कमला नगर पोलीस ठाण्यातील बाळकेश्वर पोलीस ठाणे गाठले. एका कुटुंबाच्या हातात एक पिंजरा असलेला पोपट होता, जो वारंवार मम्मी आणि पप्पा म्हणत होता. पोलिसांना हे प्रकरण समजण्यापूर्वीच दोन्ही कुटुंबांनी पोपटावर आपली मालकी सांगण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप करत स्वत:ला पोपटाचे मालक म्हणवून घेतले.
सदर प्रकरणावर पोलिसांनी चौकशी सुरू केली असता चार वर्षांपूर्वी बाळकेश्वर येथे राहणाऱ्या कुटुंबाने दुसऱ्या पक्षाकडून परदेशी जातीचा पोपट खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. ४ वर्षांपासून हे कुटुंब पोपटाची काळजी घेत होते. पोपटही त्या कुटुंबात मिसळून मालकाला मम्मी-पप्पा म्हणून हाक मारत होता. एका बाजूची संपूर्ण कहाणी ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या बाजूने पोपटाच्या मालकीची कागदपत्रे मागितली. पण, ते कुटुंब पुरावा म्हणून पोलिसांसमोर काहीही ठेवू शकले नाही. यानंतर पोलिसांनी पोपटाची काळजी घेत कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी हा निर्णय जाहीर करताच कुटुंबीय पोपटाला सोबत घेऊन गेले. पोपटाच्या मालकी हक्काचा हा वाद चर्चेचा विषय राहिला आहे. या पोपटाची इतर पक्षाला चांगलीच किंमत मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे त्याच्या मनात लोभ येऊन पोपट परत मिळवण्यासाठी तक्रार घेऊन तो पोलीस ठाण्यात आला होता, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"