क्रूरतेच्या प्रकरणात निर्दोष सुटल्याने घटस्फोट देता येत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 10:41 AM2024-03-08T10:41:56+5:302024-03-08T10:42:53+5:30
न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने सांगितले की, कनिष्ठ न्यायालयातील फौजदारी खटल्यातील पुरुषाची निर्दोष मुक्तता त्याची पत्नी हयात असताना त्याने दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवून त्याने केलेले क्रौर्य धुऊन टाकत नाही.
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने एका फौजदारी खटल्यातील व्यक्तीची निर्दोष मुक्तता हे घटस्फोट देण्याचे कारण असू शकत नाही, असे मत व्यक्त केले आणि घटस्फोट मंजूर करण्याची पतीची याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने सांगितले की, कनिष्ठ न्यायालयातील फौजदारी खटल्यातील पुरुषाची निर्दोष मुक्तता त्याची पत्नी हयात असताना त्याने दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवून त्याने केलेले क्रौर्य धुऊन टाकत नाही.
खंडपीठाने म्हटले की, वैवाहिक संबंध हे नाजूक भावनिक मानवी नाते आहे आणि तिसरी व्यक्ती यात आल्याने नात्यातील विश्वास, आत्मविश्वास आणि शांतता पूर्णपणे संपली जाऊ शकते. या जोडप्याने १९८२ मध्ये लग्न केले. त्यांना २ मुले आहेत. पतीचे एका लहान वयाच्या मुलीसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप पत्नीने केला होता.