लग्नाला विरोध केल्याने डॉक्टर प्रेयसीने त्याचे गुप्तांग कापले; तिने रडत रडत पोलिसांना फोन केला पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 03:38 PM2024-07-03T15:38:34+5:302024-07-03T15:39:32+5:30
मोठ्या कालावधीपासून लग्नाला विरोध केल्याने महिला डॉक्टर संतापली होती.
प्रेमात फसवणूक करणाऱ्या प्रियकराला धडा शिकवताना प्रेयसीने धक्कादायक कृत्य केले. लग्नास विरोध केल्याने संतापलेल्या प्रेयसीने आपल्या प्रियकराच्या गुप्तांगावर हल्ला केला. बिहारमधील छपरा जिल्ह्यातील या घटनेने एकच खळबळ माजली. येथील एका महिला डॉक्टरने प्रियकर नगरसेवकावर जीवघेणा हल्ला केला. तिने त्याचे गुप्तांग कापून गंभीर जखमी केले. संबंधित महिला डॉक्टरने व्हिडीओ शेअर करत आपल्या चुकीची कबुली दिली आहे. ती म्हणाली की, असे करून तिने तिच्या प्रियकराला त्याच्या उद्धटपणाची शिक्षाच दिली नाही तर त्याची अशी अवस्था केली आहे की, आता तो आयुष्यभर इतर कोणत्याही मुलीचे आयुष्य खराब करू शकणार नाही.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. रक्तस्त्राव होताच घाबरलेल्या तरूणीने इतरत्र फोन करून मदत मागितली. मग प्राथमिक उपचारांनंतर पोलिसांनी जखमी नगरसेवकाला जवळच्या रूग्णालयात नेले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.
महिला डॉक्टरचे धक्कादायक कृत्य
माहितीनुसार, मोठ्या कालावधीपासून लग्नाला विरोध केल्याने महिला डॉक्टर संतापली होती. ती नेहमी चीडचीड करत असे. अशातच तिने ही धक्कादायक घटना घडवून आणली. तिने स्वत: फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. जेव्हा पोलीस खोलीत आले तेव्हा सर्वत्र रक्त दिसले. तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष दाखवून त्याने शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप तिने केला. मात्र, सातत्याने लग्नासाठी टाळत असल्याने महिला संतापली होती.
दरम्यान, आरोपी महिला डॉक्टरचे नाव अभिलाषा आहे. तिचे स्थानिक वार्ड नंबर १२ येथील नगरसेवकाशी प्रेमसंबंध होते. नगरसेवक प्रकाश गुप्ताने लग्न करण्यास विरोध केल्याने तिने त्याचे गुप्तांग कापले. डॉक्टर अभिलाषाने तिच्या प्रियकराच्या प्रेमात वासनेपेक्षा काहीही नसल्याचा आरोप केला आहे. अशा परिस्थितीत त्याला अशी शिक्षा देण्याशिवाय पर्याय नव्हता, असेही तिने सांगितले.