शत्रूवर हॉवित्झर तोफ आणि रॉकेट चालविणार महिला कर्नल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 07:23 AM2023-04-25T07:23:07+5:302023-04-25T07:23:37+5:30

लष्कराचे प्रशिक्षित करण्याचे प्रयत्न

A female colonel will fire howitzer cannons and rockets at the enemy | शत्रूवर हॉवित्झर तोफ आणि रॉकेट चालविणार महिला कर्नल

शत्रूवर हॉवित्झर तोफ आणि रॉकेट चालविणार महिला कर्नल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतीय लष्करामध्ये आता महिला अधिकाऱ्यांना हॉवित्झर तोफ आणि रॉकेट चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याचसोबत लष्कराने कर्नल, त्यापुढील कमांड आणि नेतृत्वातील भूमिकांसाठी  महिला अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
सैन्यातील पहिल्या पाच महिला कॅडेट्स उत्तीर्ण झाल्यानंतर फ्रंटलाइन आर्टिलरी रेजिमेंटमध्ये अधिकारी म्हणून नियुक्त होतील. या कॅडेट्सची पासिंग आऊट परेड २९ एप्रिल रोजी  चेन्नई येथे आहे. आर्टिलरी रेजिमेंटमध्ये महिलांचा समावेश करणे हे महत्त्वाचे पाऊल आहे. 

निवडीसाठी तटस्थ निवड मंडळ
भारतीय लष्कर २०२४-२५ मध्ये पुरुष आणि महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर पदोन्नती देण्यासाठी एक संयुक्त निवड मंडळ लागू करण्याची योजना आखत आहे. लष्करात लैंगिक समानता वाढविणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. पदोन्नतीसाठी २००९ च्या बॅचपासूनच्या सर्वांसाठी संयुक्त निवड मंडळ असेल.

Web Title: A female colonel will fire howitzer cannons and rockets at the enemy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.