भाजप-आपमध्ये आता आरपारची लढाई?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 06:00 AM2022-09-20T06:00:01+5:302022-09-20T06:00:40+5:30
गेल्या तीन महिन्यांपासून आप व भाजपमध्ये सुरू झालेली ही लढाई महापालिकांच्या निवडणुकांसाठी असल्याचे बोलले जात होते
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भाजप व आपची आपसातील लढाई केवळ राजकीय राहिली नसून, आता या लढाईला आरपारचे स्वरूप आले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट पीएमओला लक्ष्य करून या लढाईची तीव्रता आणखी वाढविली आहे. दरम्यान, आपचे आमदार दुर्गेश पाठक यांना सोमवारी सकाळी ईडीने नोटीस बजावली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून आप व भाजपमध्ये सुरू झालेली ही लढाई महापालिकांच्या निवडणुकांसाठी असल्याचे बोलले जात होते. परंतु, आता दिल्ली महापालिकेची निवडणूक एवढ्यात होण्याची शक्यता मावळली आहे. परंतु, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमध्ये घट झालेली नाही.
दररोज एक नव्या आमदाराला नोटीस बजावून आपला घेरण्याचे तंत्र भाजपने सोडलेले नाही.