AC चालू ठेवून जाणं फ्लॅट मालकाला पडलं महागात; स्टॅबिलायझर गरम झाला, कपड्यांना आग लागली आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 01:03 PM2022-10-30T13:03:32+5:302022-10-30T13:04:37+5:30
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा पश्चिम येथे एसीचा स्टॅबिलायझर गरम झाल्यामुळे आग लागली.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा पश्चिम येथील पॅरामाउंट इमोशन्स या हायराईज सोसायटीच्या सातव्या मजल्यावर रात्री उशीरा अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहचले. अग्नीशमनदलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या आगीमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरात ठेवलेले काही सामान जळून खाक झाले आहे.
माहितीनुसार, पॅरामाउंट इमोशन्स सोसायटीच्या जे टॉवरच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये रात्री उशिरा अचानक आग लागल्याने संपूर्ण सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली. आग लागताच आजूबाजूच्या फ्लॅटमधील रहिवासी आपले फ्लॅट सोडून इमारतीखाली जमा झाले. सोसायटीतील लोकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलीस व अग्निशमन दलाने मिळून आग आटोक्यात आणली. फ्लॅट क्रमांक ७०५ मध्ये आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
ACच्या स्टॅबिलायझरने लागली आग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटचा मालक एसी चालू ठेवून घराबाहेर गेला होता. एसी बराच वेळ सुरू असल्याने त्याचा स्टॅबिलायझर जळाला, त्यामुळे शेजारी ठेवलेल्या कपड्यांना आग लागली. त्यानंतर हळूहळू ही आग फ्लॅटमध्ये पसरली. सोसायटीतील लोकांनी फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. तात्काळ अग्निशमन दलाच्या पथकासह आम्ही घटनास्थळी पोहोचलो. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. थोडा उशीर झाला असता तर आग आणखी पसरली असती, असेही पोलिसांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"