फटाक्यांच्या आतिशबाजीला फायरिंग समजून हॉटेलमधून मारली उडी, विदेशी पर्यटक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 08:13 PM2023-09-08T20:13:30+5:302023-09-08T20:14:33+5:30
गुरुवारी रात्रीच्या वेळी कृष्ण जन्माष्टमी निमित्त करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतिशबाजीला फायरिंग समजूनकर गडबडला आणि त्याने हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली.
राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमधील एका होटेलमध्ये थांबलेला विदेशी पर्यटक, गुरुवारी रात्रीच्या वेळी कृष्ण जन्माष्टमी निमित्त करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतिशबाजीला फायरिंग समजूनकर गडबडला आणि त्याने हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. याघटनेत तो जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला गंभीर दुखापत झालेली नाही.
नॉर्वेचा तरून फिन वॅटले जयपूर पाहण्यासाठी आला आहे -
अॅडिशनल डीसीपी (ईस्ट) सुमन चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॉर्वेतील एक तरूण फिन वॅटले जयपूर बघण्यासाठी आला आहे. जवाहर सर्कल भागातील विवेक विहारमधील एका होटेलमध्ये तोथांबला आहे. तो गुरुवारी रात्री आपल्या रूममध्ये लवकर झोपला होता. त्याने रात्री उशिरा आपल्या खोलीच्या खिडकीतून उडी मारली. यानंतर हॉटेलमध्येच त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि नंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. झोपेत आपल्यावर कुणीतरी गोळीबार करत असल्याचा भास झाला आणि आपण घाबरून स्वतःचा बचाव करण्यासाठी खिडकीतून उडी मारल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
पोलिसांकडून रूम झाडाझडती -
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त डीसीपी सुमन चौधरी घटनास्थळी पोहोचले. यानंतर त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली. संबंधित तरुणाच्या रूमचीही पाहणी करण्यात आली. मात्र त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. या संपूर्ण घटनेबाबत पोलिसांनी हॉटेल कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली. हॉटेल मधील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा जवळच कृष्ण जन्माष्टमीनिमित्त फटाक्यांची आतिशबाजी सुरू होती. अशा स्थितीत संबंधित तरुण झोपेत असल्याने फटाक्यांचा आवाज गोळीबार समजून घाबरला आणि त्याने त्याच्या रूमच्या खिडकीतून उडी मारली.