मित्राने खरेदी केली नवी बाईक, चालवल्यावर मित्राला आवडली, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 14:34 IST2025-01-23T14:34:11+5:302025-01-23T14:34:29+5:30
Rajasthan Crime News: राजस्थानमधील अलवर येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील कोटपुतली येथील बहरोड येछे एका तरुणाने दुचाकीसाठी मित्राची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला हरियाणामधून अटक करण्यात आली आहे.

मित्राने खरेदी केली नवी बाईक, चालवल्यावर मित्राला आवडली, त्यानंतर...
राजस्थानमधील अलवर येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील कोटपुतली येथील बहरोड येछे एका तरुणाने दुचाकीसाठी मित्राची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला हरियाणामधून अटक करण्यात आली आहे. तसेच त्याची चौकशी सुरू आहे. त्याने चौकशीमध्ये दिलेल्या माहितीनुसार मृत तरुण त्याचा मित्र होता. त्याने नवी दुचाकी खरेदी केली होती. मात्र ही दुचाकी त्याला आवडली होती. पण मित्राने ती देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने त्याची हत्या केली.
याबाबत बहरोड सरद पोलीस ठाण्याच्या अधिकारी सीमा सिनसिनवार यांनी सांगितले की, किरतपूरजवळ जंगलात १९ जानेवारी रोजी एक व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत सापडला होता. त्याच्या पोटावर धारदार हत्याराच्या खुणा होत्या. त्याच्या कपड्यांची तपासणी केली असता त्याच्या खिशात एक आधारकार्ड सापडले. त्यावरून त्याचं नाव राज कुमार असल्याचं समोर आलं. तो हरयाणामधील सालिमपूर जिल्ह्यातील रहिवासी होता.
राजकुमारचा मित्र आणि रेवाडी येथील रहिवासी असलेल्या रिंकू याने त्याची हत्या केली होती. तसेच त्याचा मृतदेह जंगलात फेकला होता. राजकुमार ३ महिन्यांपूर्वी नोकरीसाठी बहरोड येथे आला होता. तिथे कारखान्यात त्याची ओळख रिंकू सोबत झाली. २० दिवसांपूर्वी राजकुमार याने नवी दुचाकी खरेदी केली होती. ती त्याने रिंकू याला दाखवली होती. ही बाईक रिंकूला खूप आवडली होती. तसेच वारंवार येण्याजाण्यासाठी तो राजकुमार यांच्याकडे तो ती बाईक मागू लागला. मात्र रिंकूने बाईक देण्यास नकार दिला. त्यामुळे रिंकू नाराज झाला.
रिंकू याने राजकुमार याची हत्या करण्याटा कट रचला आणि १९ जानेवारी रोजी कारखान्यातून सुटल्यावर पार्टीच्या बहाण्याने तो त्याला घेऊन गेला. तसेच त्याला दारू पाजली. त्यानंतर हल्ला करून त्याची हत्या केली. अखेर पोलिसांनी खबरे आणि कंपनीमधील कामगारांच्या चौकशीमधून समोर आलेल्या माहितीवरून आरोपी रिंकू याला अटक केली.