Video: बंधाऱ्यात मित्र बुडत होता, पाच मित्रांनी वाचविण्यासाठी उडी मारली, तो पोहून वर आला पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 12:33 PM2024-08-12T12:33:15+5:302024-08-12T12:33:31+5:30
Rajasthan Kanota Dam Video: राजस्थानमध्ये तुफान पाऊस सुरु आहे. कानोता बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे. या बंधाऱ्यावर सहा मित्र वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेत होते.
जगभरात नुकताच मैत्री दिवस साजरा झाला. त्याच्या आठवडाभरानंतर एक हृदयद्रावक घटना घडली आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये बंधाऱ्यावरील पाण्यात डुंबायला गेलेल्या पाच मित्रांचा बुडून मृत्यू झाला आहे. एका मित्राला वाचविण्यासाठी हे पाचजण प्रयत्न करत होते, तो बुडणारा मित्र वाचला परंतू वाचवायला गेलेले ते पाच जण मात्र बुडाले आहेत.
रविवारी विकेंडला हे सर्वजण मौजमस्ती करण्यासाठी गेले होते. राजस्थानमध्ये तुफान पाऊस सुरु आहे. कानोता बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे. या बंधाऱ्यावर सहा मित्र वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेत होते. यापैकी एकाचा पाय घसरला व तो बंधाऱ्याच्या पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता पाचही मित्रांनी उडी मारली पण घडले भलतेच.
परंतू, काळाने या पाच जणांवर घाला घातला. हे पाचही जण पाण्यात बुडाले. या घटनेचा इतर व्हिडीओ बनवत होते. राज ब्रिजवासी नावाच्या तरुणाचा पाय घसरल्याने तो बंधाऱ्यातील पाण्यात बुडत होता. त्याला बुडताना पाहून राजचे इतर ५ मित्र हर्ष नागौरा, विनय मीना, विवेक माहोरे, अजय माहोरे आणि हरकेश मीना यांनी त्याला वाचवण्यासाठी उडी घेतली. परंतू राजने कसाबसा पोहत येऊन जीव वाचविला. परंतू, त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारणारे पाच मित्र बुडाले.
Tragedy strikes Jaipur!
— Jaipur Explore (@JaipurExplore) August 12, 2024
5 people drown in Kanota Dam, Jaipur, Rajasthan on Aug 11. Heartfelt condolences to the families of the victims. May their souls rest in peace. #KanotaDam#Jaipur#Rajasthan#Drowning#Tragedypic.twitter.com/ExpJpZVxyk
एसडीआरएफ आणि नागरी संरक्षण दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत बचाव मोहीम राबवत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले. जयपूरच्या शास्त्रीनगर आणि झोटवाडा येथील हे सर्वजण रहिवासी आहेत. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजता घडली.