अपघातात कारचा चेंदामेंदा; डंपरच्या धडकेत ६ मित्रांचा मृत्यू, वाढदिवस ठरला जीवघेणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 11:49 AM2023-03-04T11:49:00+5:302023-03-04T11:49:55+5:30

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती.

A friend's birthday turned fatal; 6 friends died in dumper collision in haryana palwal | अपघातात कारचा चेंदामेंदा; डंपरच्या धडकेत ६ मित्रांचा मृत्यू, वाढदिवस ठरला जीवघेणा

अपघातात कारचा चेंदामेंदा; डंपरच्या धडकेत ६ मित्रांचा मृत्यू, वाढदिवस ठरला जीवघेणा

googlenewsNext

हरयाणाच्या फरीदाबाद येथे भीषण दुर्घटना घडली, त्यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे हे सहाही जण एमेकांचे मित्र असून मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असतानाच हा अपघात झाला. पाली गावाजवळ या युवकांच्या कारने एका डंपरला धडक दिली. ज्यामध्ये कारचा चेंदामेंदा झाला असून कारमधील ६ जणांचा मृत्यू झाला. 

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर, अपघात कारमधील युवकांना तात्काळ जवळील रुग्णालयातही नेले, मात्र डॉक्टरांना सर्वांनाच मृत घोषित केले. जतिन छाबड़ा, पुनीत मंगला, संदीप वाडिया, नोनू गुलाटी, विशाल सेठी आणि संदीप अशी मृतांची नावे आहेत. सर्वचजण पलवल कँप आणि जवाहर नगरमध्ये राहत होते. या सर्व युवकांचे वय १८ ते २५ वर्षे वयाचे होते. त्यामुळे, संपूर्ण पलवलमध्ये शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. 

आपला मित्र रिंकूचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सर्व मित्र गुरुग्रामला जात असताना ही भीषण दुर्घटना घडली. या घटनेनं कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून यांच्या सर्व मित्रांनाही धक्का बसलाय. 
 

Web Title: A friend's birthday turned fatal; 6 friends died in dumper collision in haryana palwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.