शेपूट असलेली मुलगी जन्मली अन् सर्वच चकित!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 08:25 AM2022-12-01T08:25:46+5:302022-12-01T08:26:20+5:30
अर्भकाचा जन्म ईशान्य मेक्सिकोमधील ग्रामीण रुग्णालयात झाला होता.
नवी दिल्ली : शेपटीसह मुलीचा जन्म झाल्याची वैद्यकीय शास्त्रातील एक दुर्मिळ घटना मेक्सिकोमधून समोर आली आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ही शेपटी आता काढली असून, मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळून दोन महिन्यांहून अधिक काळ लोटल्याची माहिती जर्नल ऑफ पेडियाट्रिक सर्जरीमध्ये प्रकाशित झाली आहे.
अर्भकाचा जन्म ईशान्य मेक्सिकोमधील ग्रामीण रुग्णालयात झाला होता. शेपटीची लांबी ५.७ सेंमी होती, व्यास ३ ते ५ मिमी दरम्यान होता. त्यानंतर काही दिवसाने शेपटीची लांबी ०.८ सेंमीने वाढली. ही दुर्मिळ शेपटी दंडगोलाकार होती आणि टोकाकडे वळलेली होती. त्यात हाड नव्हते. जन्माच्या वेळी शेपटीवर काही प्रमाणात केसदेखील होते.