समुद्रातून वाहत आला चक्क सोनेरी रथ! आंध्र प्रदेशमध्ये सारेच चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 06:43 AM2022-05-12T06:43:37+5:302022-05-12T06:43:48+5:30
अमरावती : ‘असनी’ चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील जनजीवन विस्कळीत झाले असतानाच श्रीकाकुलम जिल्ह्यातील सुन्नापल्ली गावात आश्चर्यकारक प्रकार उघडकीस आला. ...
अमरावती : ‘असनी’ चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील जनजीवन विस्कळीत झाले असतानाच श्रीकाकुलम जिल्ह्यातील सुन्नापल्ली गावात आश्चर्यकारक प्रकार उघडकीस आला. चक्क एक सोनेरी रथच या गावातील किनारपट्टीला थडकला आहे. हा रथ पाहण्यासाठी केवळ सुन्नापल्लीतीलच नव्हे तर पंचक्रोशीतील कैक ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
सुन्नापल्लीच्या ग्रामस्थांची मंगळवारची सकाळ आश्चर्याची ठरली. काहींना समुद्रातून चक्क एक सोनेरी रथ वाहून येत असल्याचे दिसले. ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. किनाऱ्यावर गर्दी जमली. मोठे दोरखंड आणून हा सोनेरी रथ किनाऱ्यावर आणण्यात आला. रथ सोन्याचा असावा, असा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केल्याने गोंधळात भर पडली. दरम्यान, या प्रकाराची माहिती जिल्हा प्रशासनासह पोलिसांनाही देण्यात आली. पोलिसांनीही किनाऱ्याकडे धाव घेत रथ ताब्यात घेतला. (वृत्तसंस्था)
थायलंड की म्यानमारमधील?
n सोनेरी रथाबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. स्थानिकांच्या मते हा रथ चक्रीवादळामुळे समुद्रात निर्माण झालेल्या मोठ्या लाटांवर स्वार होत थायलंड किंवा म्यानमारमधून आला असावा.
n इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया किंवा म्यानमार या देशांतील समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या मठातून हा रथ वाहत आला असावा, असे काहींचे मत आहे. भारतातच पूर्व किनारपट्टीवर एखाद्या चित्रीकरण स्थळावरून बंगालच्या उपसागरातून हा रथ वाहून आला असावा, असा काहींचा कयास आहे.