जैन समाजाचा मोठा विजय; प्रचंड विरोधानंतर केंद्राने झारखंड सरकारचा तो निर्णय रोखला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 08:31 PM2023-01-05T20:31:30+5:302023-01-05T20:34:23+5:30

केंद्राच्या या हा निर्णयाला विविध शहरात निदर्शने करणाऱ्या जैन समाजाचा मोठा विजय मानला जात आहे.

A great victory for the Jain community; The Center blocked that decision of the Jharkhand government | जैन समाजाचा मोठा विजय; प्रचंड विरोधानंतर केंद्राने झारखंड सरकारचा तो निर्णय रोखला

जैन समाजाचा मोठा विजय; प्रचंड विरोधानंतर केंद्राने झारखंड सरकारचा तो निर्णय रोखला

googlenewsNext

नवी दिल्ली- देशभरातील विविध शहरांमध्ये जैन समाजाकडून सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, समेद शिखरचे पर्यटन स्थळात रूपांतर करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय केंद्राने गुरुवारी रोखून धरला. याशिवाय, गिरिडीहमधील जैन समाजाचे सर्वात पवित्र ठिकाण असलेल्या पारसनाथ टेकड्यांवरील पर्यटनाला चालना देण्याच्या मुद्द्यावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक समितीही स्थापन केली आहे. 

केंद्राच्या या निर्णयाला दिल्ली, मुंबई, भोपाळ, अहमदाबाद आणि सुरतच्या रस्त्यावर निदर्शने करणाऱ्या जैन समाजाचा मोठा विजय मानला जात आहे. या ठिकाणाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणाऱ्या सर्व अधिसूचना रद्द करण्याची त्यांची मागणी आहे. अत्यल्प लोकसंख्या असलेल्या अल्पसंख्याक समुदायाला यामुळे परिसरात दारू आणि मांसाहारी पदार्थांचे सेवन होऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जातील, अशी भीती आहे.

गिरिडीह जिल्ह्यातील पारसनाथ टेकडीवर वसलेले श्री सम्मेद शिखर जी, रांचीपासून सुमारे 160 किमी अंतरावर राज्यातील सर्वोच्च शिखरावर वसलेले आहे. हे जैन समाजातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक आहे, ज्यामध्ये दिगंबर आणि श्वेतांबर या दोन्ही पंथांचा समावेश आहे. या ठिकाणी 24 जैन तीर्थंकरांपैकी 20 जणांनी मोक्ष प्राप्त केला होता.

पारसनाथ टेकडीला पर्यटन स्थळ घोषित करू नये, या मागणीवर जैन समाज ठाम आहे. तेथे हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट्स उभे राहून या ठिकाणाचे पावित्र्य नष्ट होईल, या भीतीने जैन समाजाच्या वतीने या टेकडीला पर्यटनस्थळ घोषित करण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. 2019 ची अधिसूचना मागे घेण्याची मागणी करत जैन समाजाने मंगळवारी राज्याच्या राजधानीत राजभवनावर मोर्चा काढला होता. यापूर्वी, झारखंड सरकारच्या निर्णयाविरोधात उपोषण करणाऱ्या जैन साधू सुग्यसागर महाराज (72) यांचे मंगळवारी जयपूरमध्ये निधन झाले. 

 

Web Title: A great victory for the Jain community; The Center blocked that decision of the Jharkhand government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.