२०२४ मध्ये उष्णतेची लाट, नॉस्ट्रेदामसने भविष्यवाणी केलेली; आणखी काय वाढून ठेवलेय...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 06:17 PM2024-06-22T18:17:38+5:302024-06-22T18:38:37+5:30

नॉस्ट्रेदामसने गेल्या 100 वर्षांसाठी जर्मनीत अॅडॉल्फ हिटलरच्या उदयापासून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्यावर गोळीबार आणि 2022 मध्ये जगण्याच्या संकटापर्यंत अशा अनेक गोष्टींवर भाकिते केली होती. यापैकी बरीच खरी ठरली आहेत.

A heat wave in 2024, predicted by Nostradamus; What else is predicted for remaining year | २०२४ मध्ये उष्णतेची लाट, नॉस्ट्रेदामसने भविष्यवाणी केलेली; आणखी काय वाढून ठेवलेय...

२०२४ मध्ये उष्णतेची लाट, नॉस्ट्रेदामसने भविष्यवाणी केलेली; आणखी काय वाढून ठेवलेय...

जगविख्यात भविष्यवेत्त्याने ४५० वर्षांपूर्वी त्याचे पुस्तक लेस प्रोफेटीज़मध्ये जगातील अशा काही घटनांचे भाकीत केले आहे की त्या वेळोवेळी खऱ्या ठरत आल्या आहेत. २०२४ मध्येही काय काय घडेल याचा अर्थ त्याच्या अनुयायांनी लावला होता. हा भविष्यवेत्ता नॉस्ट्रेदामस होता. त्याने २०२४ मध्ये उष्णतेची लाट येईल, हवामान बदल होऊन दुष्काळ पडेल असे म्हटले होते. आता संपूर्ण भारत उन्हाच्या लाटांत होरपळत आहे. तर सौदीमध्ये देखील उष्णतेत कमालीची वाढ झाली आहे. 

नॉस्ट्रेदामसने गेल्या 100 वर्षांसाठी जर्मनीत अॅडॉल्फ हिटलरच्या उदयापासून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्यावर गोळीबार आणि 2022 मध्ये जगण्याच्या संकटापर्यंत अशा अनेक गोष्टींवर भाकिते केली होती. यापैकी बरीच खरी ठरली आहेत. सात महिन्यांचे एक मोठे युद्ध होईल, ज्यामध्ये लोक त्यांच्या वाईट कृत्यांमुळे मरतील आणि रौएन आणि एव्हरेक्स राजाच्या अधीन राहणार नाहीत, असे नॉस्ट्रेदामसने म्हटले आहे. याच काळात दोन युद्धे सुरु झाली आहेत. 

तसेच या भविष्यवेत्त्याने २०२४ मध्ये मोठे आर्थिक संकट येणार असल्याचेही म्हटलेले आहे. यामुळे जगाची परिस्थिती बिकट होऊ शकते असेही म्हटले आहे. अमेरिका, युरोप, चीनसारख्या मोठ्या अर्थव्यवस्था कोलमडलेल्या आहेत. यातच युद्धे सुरु असल्याने मोठी अस्थिरता आहे. 

चीन फोडणार युद्धाला तोंड - नास्त्रेदेमसने लढाई आणि नौसैनिक युद्धाचीही भविष्यवाणी केली आहे. त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलंय की, लाल शत्रू भीतीने पिवळा पडेल. तसेच विशाल महासागराला भयभीत करेल. यातील लाल याचा अर्थ चीन आणि नौसैनिक युद्ध म्हणजे तैवानसोबत तणाव, असा, अर्थ सांगितला जात आहे. 

नैसर्गिक आपत्ती - नास्त्रेदेमसने खराब हवामानाच्या घटना आणि जागतिक पातळीवर उपासमारीबाबतही भविष्यवाणी केली आहे. त्यांनी सांगितले की, या काळात मोठा दुष्काळ पडू शकतो.

पोप फ्रान्सिस यांची जागा कुणीतरी अन्य घेईल - नास्त्रेदेमसने त्याच्या भविष्यवाणीमध्ये पोप फ्रान्सिस यांची जागा कुणीतरी अन्य व्यक्ती घेईल, असंही म्हटलं आहे. त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे की, एका वृद्ध पोंटिफचा मृत्यू होईल, त्यानंतर कमी वयाच्या एका रोमनची निवड होईल. तो दीर्घकाळ गादीवर बसेल. 
 

Web Title: A heat wave in 2024, predicted by Nostradamus; What else is predicted for remaining year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.