तिसऱ्यांदा दारू पिऊन गाडी चालवताना पकडला; 9 हजाराचं चालान कापल्याने मजुराने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 05:15 PM2023-03-09T17:15:36+5:302023-03-09T17:16:25+5:30

हैदराबादमध्ये एका 50 वर्षीय मजुराने शुल्लक कारणावरून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

A laborer ended his life after he was caught drunk driving for the third time in Hyderabad and a challan of Rs 9,000 was issued   | तिसऱ्यांदा दारू पिऊन गाडी चालवताना पकडला; 9 हजाराचं चालान कापल्याने मजुराने संपवलं जीवन

तिसऱ्यांदा दारू पिऊन गाडी चालवताना पकडला; 9 हजाराचं चालान कापल्याने मजुराने संपवलं जीवन

googlenewsNext

नवी दिल्ली : हैदराबादमध्ये एका 50 वर्षीय मजुराने शुल्लक कारणावरून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला तिसऱ्यांदा दारू पिऊन गाडी चालवताना पकडण्यात आले असता, पोलिसांनी त्याच्याकडून हजारो रुपयांचे चालान कापले. मग व्यथित झालेल्या मजुराने सैदाबाद येथील राहत्या घरी कीटकनाशक प्राशन करून जीवन संपवले. याप्रकरणी आता त्याच्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी ए येलैया या मजुराची दुचाकी जप्त केली होती. यासोबतच त्याला 9 हजार रूपयांचे चालान भरण्यास सांगितले. यानंतर अस्वस्थ होऊन तो घरी परतला आणि त्याने आत्महत्या केली. त्याच्या पॉकेटमधून एक सुसाईड नोटही सापडली असून, त्यात वाहनाच्या चालानबाबत नाराजी नोंदवण्यात आली आहे. 

दुचाकी परत न मिळण्याच्या भीतीने संपवलं जीवन
येलैया यांची पत्नी मल्लम्मा हिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, मी पतीला ओवेसी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पाकिटात सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीत पतीने आपल्या विरोधात ट्रॅफिक चालान बजावण्यात आले असून आपली दुचाकी परत मिळणार नाही या भीतीने आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. 

पत्नी मल्लम्माच्या तक्रारीवरून सैदाबाद पोलिसांनी सीआरपीसी कलम 174 अन्वये संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर, नलगोंडा जिल्ह्यातील नेरेडिकोम्मा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: A laborer ended his life after he was caught drunk driving for the third time in Hyderabad and a challan of Rs 9,000 was issued  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.