विखारी बोलणाऱ्यांना शिकविला धडा, भाजपच्या पहिल्या यादीतून पत्ता कट; काहींची राजकीय संन्यासाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 06:55 AM2024-03-04T06:55:17+5:302024-03-04T06:57:20+5:30

सतत वादग्रस्त विधाने करणाऱ्या प्रज्ञा ठाकूर, दोन वेळा खासदार राहिलेले परवेश साहिब सिंग वर्मा, बसपाच्या दानिश अली यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांना रमेश बिधुरी यांना संधी देण्यात आली नाही. 

A lesson taught to those who talk unnecessarily, cut the address from the first list of BJP; Some announced political retirement | विखारी बोलणाऱ्यांना शिकविला धडा, भाजपच्या पहिल्या यादीतून पत्ता कट; काहींची राजकीय संन्यासाची घोषणा

विखारी बोलणाऱ्यांना शिकविला धडा, भाजपच्या पहिल्या यादीतून पत्ता कट; काहींची राजकीय संन्यासाची घोषणा

नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी १९५ जणांची पहिली यादी जाहीर केली. द्वेषपूर्ण भाषण करणाऱ्या नेत्यांना पहिल्या यादीत डावलून त्यांना भाजपने एकप्रकारे इशारा दिला. त्यानंतर काहींनी राजकीय संन्यासाची घोषणा केली, तर उमेदवारी मिळालेल्या काहींनी  लढण्यास असमर्थता व्यक्त केली.  

सतत वादग्रस्त विधाने करणाऱ्या प्रज्ञा ठाकूर, दोन वेळा खासदार राहिलेले परवेश साहिब सिंग वर्मा, बसपाच्या दानिश अली यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांना रमेश बिधुरी यांना संधी देण्यात आली नाही. 

पवन सिंह यांनी दिला लढण्यास नकार
भोजपुरी गायक पवन सिंह यांनी वैयक्तिक कारणास्तव रविवारी पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. दरम्यान, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांना दिल्लीला बोलावले आहे.

क्लिनिक माझी वाट पाहत आहे : 
विद्यमान खासदार व माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या जागी भाजपने प्रवीण खंडेलवाल यांना तिकीट दिले. त्यानंतर हर्षवर्धन यांनी रविवारी सक्रीय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. माझे क्लिनिक माझी वाट पाहत आहे, असे त्यांनी सांगितले.

माजी उपमुख्यमंत्री रिंगणातून बाहेर
गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी मेहसाणा लोकसभा मतदारसंघातून आपली दावेदारी मागे घेतली आहे. ‘मी मेहसाणासाठी दावेदारी दाखल केली होती, परंतु काही कारणास्तव माझी दावेदारी मागे घेत आहे,’ असे ते म्हणाले.
 

Web Title: A lesson taught to those who talk unnecessarily, cut the address from the first list of BJP; Some announced political retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.