वाहतूक कोंडीत जातो भरपूर वेळ; कोणत्या शहरात वाहनांची गती कमी?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 07:08 AM2023-10-05T07:08:03+5:302023-10-05T07:08:27+5:30
नवी दिल्ली : जगात सर्वांत धीम्या गतीने वाहतूक असलेल्या प्रमुख १० शहरांमध्ये कोलकाता, भिवंडी आणि आरा या शहरांचा समावेश ...
नवी दिल्ली : जगात सर्वांत धीम्या गतीने वाहतूक असलेल्या प्रमुख १० शहरांमध्ये कोलकाता, भिवंडी आणि आरा या शहरांचा समावेश आहे. नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चच्या ‘ट्राफिक स्पीड इंडेक्स’ अहवालात ही माहिती देण्यात आली.
माहितीनुसार, अमेरिकेतील फ्लिंटमध्ये वाहनांची गती सर्वाधिक, तर बांगलादेशची राजधानी ढाक्यामध्ये वाहनांचा वेग सर्वात कमी आहे. कोलंबियाच्या बोगोटा हे जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर ठरले.
कोंडी फोडण्यासाठी ‘कर’
कर्नाटक सरकारने बंगळुरूतील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या मार्गांवर ‘कंजेशन टॅक्स’ लावण्याचा विचार करत आहे. गर्दीच्या वेळी महत्त्वाच्या रस्त्यांवर येणाऱ्या वाहनांवर कर लावण्यासाठी समितीने प्रस्ताव मांडला आहे.
मुंबईचा क्रमांक कितवा?
वाहतुकीचा वेग सर्वात कमी असलेल्या १० शहरांमध्ये ९ शहरे बांगलादेश, भारत आणि नायजेरियामधील आहे.
भिवंडी ५ व्या, कोलकाता ६ व्या, तर आरा हे ७ व्या क्रमांकावर आहे.
बिहार शरीफ ११ व्या, मुंबई १३ व्या, ऐजवॉल १८ व्या, बंगळुरू शहराचा १९ वा क्रमांक लागतो.