विवाहित महिलेला भेटायला आलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी पकडलं; दोघांनाही बांधून केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 04:53 PM2023-03-10T16:53:36+5:302023-03-10T16:54:02+5:30
उत्तर प्रदेशातील उन्नाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
उन्नाव : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उन्नावमधील बारसगवार पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत दुसऱ्या गावातील तरुणाचे प्रेमसंबंध होते. खरं तर संबंधित प्रेयसी विवाहित आहे. प्रेयसीच्या सांगण्यावरून प्रियकर गुरुवारी रात्री उशिरा तिला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. तिथे दोघांनाही गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले आणि एकत्र बांधून मारहाण केली.
गावकऱ्यांनी या प्रेमी युगुलाला पकडले आणि दोघांनाही एकमेकांना बांधून मारहाण करण्यात आली. प्रियकर गावकऱ्यांची माफी मागत राहिला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या ताब्यातून दोघांची सुटका केली. प्रियकराची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तरुणाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे.
विवाहितेला भेटणं पडलं महागात
खरं तर एका विवाहित महिलेचे करमी गावात राहणाऱ्या एका अविवाहित तरुणाशी प्रेमसंबंध होते. रात्री उशिरा महिलेच्या फोनवरून प्रियकर तिच्या घरी पोहोचला. काही वेळाने परिसरातील लोकांना याची माहिती मिळताच त्यांनी दोघांना रंगेहाथ पकडले आणि त्यांना मारहाण केली. प्रियकर हात जोडून गावकऱ्यांकडून सुटकेसाठी प्रयत्न करत होता. मात्र गावकरी त्याला मारहाण करत होते. प्रकृती गंभीर झाल्याने तो बेशुद्ध झाला.
पोलिसांनी दिले कारवाई करण्याचे आश्वासन
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांचीही गावकऱ्यांच्या ताब्यातून सुटका केली. त्याचवेळी या तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित तरुणाच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी बारसागवार पोलीस ठाणे गाठून मलुहाखेडा गावातील पाच जणांच्या विरोधात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली. विवाहित महिलेचा पती हैदराबाद, तेलंगणा येथे एका हॉटेलमध्ये काम करतो आणि महिलेला दोन मुले आहेत, असे सांगितले जात आहे. बारसागवार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांनी दोघांनाही मारहाण केली. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"