केरळच्या कोच्चि विद्यापीठात संगीत कार्यक्रमादरम्यान मोठी दुर्घटना! चेंगराचेंगरीत ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 09:34 PM2023-11-25T21:34:21+5:302023-11-25T21:34:37+5:30

केरळमधील कोची येथील कुसॅट विद्यापीठात शनिवारी एका संगीत कार्यक्रमादरम्यान मोठी दुर्घटना घडली. विद्यापीठात झालेल्या चेंगराचेंगरीत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

A major accident during a music program at Kusat University, Kochi! 4 students died in the stampede | केरळच्या कोच्चि विद्यापीठात संगीत कार्यक्रमादरम्यान मोठी दुर्घटना! चेंगराचेंगरीत ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

केरळच्या कोच्चि विद्यापीठात संगीत कार्यक्रमादरम्यान मोठी दुर्घटना! चेंगराचेंगरीत ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

केरळच्या कोच्चि विद्यापीठात शनिवारी एका संगीत कार्यक्रमादरम्यान मोठी दुर्घटना घडली. विद्यापीठात झालेल्या चेंगराचेंगरीत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.

आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता गांधी यांच्या कॉन्सर्ट दरम्यान हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठ कॅम्पसमधील ओपन एअर ऑडिटोरियममध्ये संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. जखमींवर उपचारासाठी कलामसेरी वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या चार विद्यार्थ्यांमध्ये 2 मुले आणि 2 मुली आहेत. 

 दोन विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक विश्लेषणानुसार, जेव्हा पाऊस सुरू झाला तेव्हा मागच्या बाजूला असलेले विद्यार्थी समोरच्या दिशेने धावू लागले. यावेळी चेंगराचेंगरी झाली. 

Web Title: A major accident during a music program at Kusat University, Kochi! 4 students died in the stampede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात