एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला, सेकंदांचाही विलंब झाला असता तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 05:26 PM2023-03-26T17:26:43+5:302023-03-26T17:27:25+5:30

Air India Planes Avoid Collision: अवघ्या काही क्षणांमुळे एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळल्याचे समोर आले आहे. नेपाळमध्ये एअर इंडिया आणि नेपाळ एअर लाइन्सची विमानं ही हवेत एकमेकांजवळ आली. त्यामुळे काही क्षणांचा विलंब झाला असता तरी त्यांची टक्कर झाली असती.

A major accident of an Air India plane was avoided, if there had been a delay of even seconds... | एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला, सेकंदांचाही विलंब झाला असता तर...

एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला, सेकंदांचाही विलंब झाला असता तर...

googlenewsNext

अवघ्या काही क्षणांमुळे एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळल्याचे समोर आले आहे. नेपाळमध्येएअर इंडिया आणि नेपाळ एअर लाइन्सची विमानं ही हवेत एकमेकांजवळ आली. त्यामुळे काही क्षणांचा विलंब झाला असता तरी त्यांची टक्कर झाली असती. सुदैवाने इशारा प्रणालीने पायलटांना सतर्क केले. त्यामुळे एक मोठा विमान अपघात टळला. ही घटना शुक्रवारची आहे. मलेशियाहून येत असलेलं नेपाळ एअर लाइन्सचं विमान आणि आणि दिल्लीहून येत असलेलं एअर इंडियाचं विमान एकमेकांच्या जवळ आल्याने टक्कर होण्याची भीती निर्माण झाली होती.

आज या घटनेची माहिती देताना सीएएएनचे प्रवक्ते जगन्नाथ निरौला यांनी सांगितले की, नेपाळळच्या हवाई वाहतूक प्राधिकरणाने या बेफिकीरीसाठी वाहतूक नियंत्रणक विभागातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. शुक्रवारी सकाळी मलेशियाच्या क्वालालंपूर येथून काठमांडू येथे येत असलेलं नेपाळ एअरलाइन्सचं विमान आणि नवी दिल्लीहून काठमांडूकडे येत असलेलं एअर इंडियाचं विमान यांची एकमेकांमध्ये टक्कर होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

निरौला यांनी सांगितले की, एअर इंडियाचं विमान १९ हजार फुटांवरून खाली येत होतं. तर नेपाळ एअरलाइन्सचं विमान त्याच ठिकाणी १५ हजार फुटांवर होतं. रडारवर हे दिसल्यानंतर नेपाळ एअरलाइन्सचं विमान ७ हजार फूट आणखी खाली आलंय त्यामुळे मोठा अपघात टळला. 

त्यांनी सांगितलं की, हवाई वाहतूक प्राधिकरणाने या प्रकरणी तपास करण्यासाठी तीन सदस्यीय तपास समितीची स्थापना केली आहे. सीएएएनने या घटनेवेळी कंट्रोल रूमचे प्रभारी असलेल्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तर या प्रकरणी एअर इंडियाकडून कुठलंही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.  

Web Title: A major accident of an Air India plane was avoided, if there had been a delay of even seconds...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.