दिल्लीतील एका पेंट फॅक्टरीला भीषण आग, ११ जणांचा मृत्यू, अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 08:43 IST2024-02-16T08:42:13+5:302024-02-16T08:43:40+5:30
दिल्लीतील एका मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

दिल्लीतील एका पेंट फॅक्टरीला भीषण आग, ११ जणांचा मृत्यू, अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी दाखल
दिल्लीतील एका मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर दिल्लीतील अलीपूर भागातील दयाल मार्केटमधील एका पेंट फॅक्टरीत ही घटना घडली. गुरुवारी सायंकाळी उशिरा मार्केटमध्ये भीषण आग लागली. आग लागल्यानंतर एकही कामगार कारखान्यातून बाहेर पडू शकला नाही. मृत कामगारांची ओळख अद्याप पटलेली नाही.
शेतकऱ्यांना रोखण्यासाठी ३० हजार अश्रूधुराच्या नळकांड्यांची ऑर्डर!
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. ही एक मजली इमारत होती जिथे पेंट निर्मिती केली जात होती. अलीपूरच्या दयाल मार्केटमध्ये लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी २२ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
घटनेनंतर काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या२२ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आली. अलीपूरच्या दयालपूर मार्केटमध्ये असलेल्या कारखान्याच्या परिसरातून सात जणांचे मृतदेह सापडले.