घुसखोरीचा मोठा कट उधळला; जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 08:53 AM2022-08-24T08:53:33+5:302022-08-24T08:53:42+5:30
सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमध्ये आणखी एका दहशतवादी कट-कारस्थानाचा पर्दाफाश झाला आहे. सोपोरमध्ये सुरक्षा दलांनी लष्करच्या संकरित (हायब्रीड) दहशतवाद्याला आणि एका ओव्हर ग्राउंड वर्करला अटक केली आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत सोपोर पोलिसांनी मंगळवारी लष्कर-ए-तय्यबाच्या एक हायब्रीड दहशतवाद्याला आणि एका ओजीडब्ल्यूला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
J&K | Sopore Police, along with security forces arrested one hybrid LeT terrorist and one OGW today; arms and ammunition recovered. Case registered and investigation is undergoing. pic.twitter.com/E0LEhl7P1M
— ANI (@ANI) August 23, 2022
भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेच्या नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळून लावला. यावेळी पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात यश मिळवलंय. मिळालेल्या माहितीनुसार, 22-23 ऑगस्टच्या मध्यरात्री दहशतवाद्यांनी नौशेरा सेक्टरमध्ये एलओसीजवळ घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान तैनात भारतीय जवानांनी ही घुसखोरी हाणून पाडली.