छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 12:54 PM2024-11-16T12:54:02+5:302024-11-16T13:13:17+5:30

छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये पोलीस कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

A major operation against Naxalites in Chhattisgarh, 5 people were killed in an encounter with security forces | छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त सीमावर्ती भागात अबुझमद येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत सुरक्षा दलांनी ५ नक्षलवादी ठार केले आहेत. अजूनही चकमक सुरूच असल्याचे वृत्त आहे. दोन्ही बाजूंमध्ये अधूनमधून गोळीबार होत आहे. चकमकीनंतर जवानांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. 

मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय

पोलिसांनी आतापर्यंत शोध मोहिमेदरम्यान एक ऑटोमॅटिक रायफल जप्त केली आहे. या चकमकीत अनेक नक्षलवादी जखमी झाल्याचेही वृत्त आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. दोन्ही जखमी जवानांना चकमकीच्या ठिकाणाहून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. 

उत्तर अबुझमद भागात नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा जवानांना मिळाली होती, या माहितीच्या आधारे डीआरजी, एसटीएफ आणि बीएसएफच्या संयुक्त पोलिस पथकाने शनिवारी सकाळी ८ वाजता शोध मोहीम सुरू केली. ही शोधमोहीम सुरू होताच सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.

नक्षल संघटनेच्या केंद्रीय समिती सदस्य अभयला पकडण्यासाठी छत्तीसगडच्या कांकेर आणि नारायणपूर जिल्ह्यातून डीआरजी, बीएसएफ आणि महाराष्ट्राच्या सी-60 कमांडोच्या संयुक्त पथकाने सुरू केलेल्या ऑपरेशनचा भाग होता, अशी ही चकमक होती.

आज सकाळी आठच्या सुमारास सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक सुरू झाली. सुरक्षा दलाच्या रणनीतीनुसार नक्षलवाद्यांना घेरण्याची कारवाई करण्यात येत आहे, त्यामुळे चकमकीच्या ठिकाणची परिस्थिती झपाट्याने बदलत आहे.

Web Title: A major operation against Naxalites in Chhattisgarh, 5 people were killed in an encounter with security forces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.