सिलीगुडीत रेल्वेचा मोठा अपघात टळला, राजधानी एक्स्प्रेस आणि मालगाडी एकाच रुळावर आली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 07:05 PM2024-08-19T19:05:30+5:302024-08-19T19:15:38+5:30
बंगालमधील सिलीगुडीजवळ राजधानी एक्स्प्रेसची मालगाडीशी होणारी टक्कर थोडक्यात टळली आहे. मोठा अपघात टळला आहे.
बंगालमधील सिलीगुडीजवळील एनजेपी परिसरात राजधानी एक्स्प्रेसची मालगाडीशी होणारी टक्कर थोडक्यात टळली. दोन्ही गाड्या एकाच मार्गावर आल्या होत्या. राजधानी एक्स्प्रेसच्या लोको पायलटच्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला. मात्र, अचानक ब्रेक लावल्याने काही प्रवासी जागेवरून खाली पडल्याने त्यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला; CRPF च्या अधिकाऱ्याला वीरमरण
पश्चिम बंगालमध्ये अशी दुर्घटना होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही तेथे अनेक अपघात झाले आहेत. १७ जून रोजी आगरतळाहून सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला न्यू जलपाईगुडी स्टेशनपासून ३० किमी अंतरावर मालगाडीने धडक दिली होती.
मालगाडीने पॅसेंजर ट्रेनला मागून धडक दिली. या अपघातात आतापर्यंत १५ जणांना जीव गमवावा लागला आहे. तर ६० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालगाडीच्या चालकाने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याने कांचनजंगा ट्रेनच्या मागील बाजूस धडकली.
कांचनजंगा कोचमध्ये दोन पार्सल व्हॅन आणि गार्ड कोच आहेत. अपघातानंतर एनडीआरएफ, विभागीय पथक आणि १५ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या.
रेल्वेचा २००२ मध्ये एक भीषण अपघात झाला होता. कलकत्त्याहून नवी दिल्लीला जाणाऱ्या लक्झरी राजधानी एक्स्प्रेसचे काही डबे धाभी नदीत पडले होते. यामध्ये किमान १२० लोकांना आपला जीव गमवावा लागला.