केंद्र सरकारचे मोठे पाऊल, CISF च्या पहिल्या महिला राखीव बटालियनला मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 09:47 PM2024-11-12T21:47:51+5:302024-11-12T21:51:03+5:30

केंद्र सरकारचे मोठे पाऊल, CISF च्या पहिल्या महिला राखीव बटालियनला मान्यता

A major step by the central government, recognition of the first women's reserve battalion of the CISF | केंद्र सरकारचे मोठे पाऊल, CISF च्या पहिल्या महिला राखीव बटालियनला मान्यता

केंद्र सरकारचे मोठे पाऊल, CISF च्या पहिल्या महिला राखीव बटालियनला मान्यता

CISF : विमानतळासह इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा दलांची झपाट्याने वाढणारी तैनाती लक्षात घेऊन केंद्र सरकारने पहिल्या महिला CISF राखीव बटालियनला मान्यता दिली आहे. यामध्ये 1 हजाराहून अधिक महिला कर्मचारी भरती केले जाणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या मंजूर दोन लाख CISF कर्मचाऱ्यांमधून हे युनिट तयार केले जाईल. केंद्रीय गृहमंत्रालयाने याच आठवड्यात आपला आदेश जारी केला आहे. वरिष्ठ कमांडंट दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एकूण 1025 महिला कॉन्स्टेबल या बटालियनमध्ये असतील.

CISF च्या सध्या 12 राखीव बटालियन आहेत
सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) कडे 12 राखीव बटालियन आहेत. नावाप्रमाणेच, या बटालियन्स राखीव ठेवल्या जातात. निवडणूक आणि इतर महत्वाच्या प्रसंगांसाठी CISF ची तात्पुरती नियुक्ती केली जाते. तेव्हा त्यांचा अतिरिक्त फोर्स म्हणून वापर केला जातो. संसद भवन संकुलासारख्या महत्त्वाच्या ठिकाणाची सुरक्षाही ते सांभाळत असून, या वर्षी संसदेची जबाबदारी सोपवण्यात आली.

विशेष म्हणजे, CISF मध्ये महिला कर्मचारी देखील मोठ्या संख्येने आहेत, ज्या 68 सार्वजनिक विमानतळ, दिल्ली मेट्रो आणि ताजमहाल आणि लाल किल्ला सारख्या ऐतिहासिक वारसा स्थळांचे संरक्षण करतात. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सीआयएसएफने ऑल वुमन राखीव बटालियनची गरज व्यक्त केली होती, ज्याला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. 

 

Web Title: A major step by the central government, recognition of the first women's reserve battalion of the CISF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.