आई, आपल्या मुलाला कधीच हार मानू देत नाही; यूपीएससीत संधी हुकलेल्या 'रजत'ची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 10:44 AM2022-06-02T10:44:40+5:302022-06-02T10:49:32+5:30

यूपीएससीत ११ मार्कांनी संधी हुकलेल्या मुलाला करून दिली ‘अर्जुन’ची आठवण

A mother never lets her child down; See the story of Rajat of Jammu and Kashmir | आई, आपल्या मुलाला कधीच हार मानू देत नाही; यूपीएससीत संधी हुकलेल्या 'रजत'ची कहाणी

आई, आपल्या मुलाला कधीच हार मानू देत नाही; यूपीएससीत संधी हुकलेल्या 'रजत'ची कहाणी

googlenewsNext

नवी दिल्ली : कितीही मोठा पराभव झाला तरी आपल्या मुलाने पुन्हा उठून उभे राहावे, लढावे... अशी प्रत्येक आईची इच्छा असते. असाच प्रत्यय यूपीएससीसाठी दहा वर्षे घालवूनही थोडक्यात यश हुकलेल्या मुलाच्या बाबतीत आला आहे. महाभारतात अर्जुनने कधीही हार मानली नाही... असा दाखला देत या आईने आपल्या मुलाला पुन्हा भरारी घेण्याचे बळ दिले आहे. 

शेवटपर्यंत अनेक प्रयत्न करूनही थोडक्यात संधी हुकली, असाच एक उमेदवार म्हणजे रजत सांबियाल. यूपीएससीसाठी अखेरच्या प्रयत्नातही केवळ ११ मार्क कमी पडल्याने त्याच्या पदरी पुन्हा निराशा आली. त्यानंतर ट्विटरद्वारे त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली व १० वर्षांच्या मेहनतीची राख झाली, असे म्हटले. त्याचे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला सांत्वना दिली, सोबत त्याच्या आईनेही मुलाचे खच्चीकरण होणार नाही असा रिप्लाय टि्वटरवर दिला आहे. रजतच्या आईचा रिप्लाय वाचून अनेकांना आपल्या आईची आठवण झाली असणार हे नक्की. 

रजत काय म्हणतो... 

‘१० वर्षांच्या मेहनतीची राख झाली....यूपीएससीचे ६ प्रयत्न संपले...प्रिलिममध्ये ३ वेळा नापास...मुख्य परीक्षेतही २ वेळेस अयशस्वी...असे ट्वीट रजतने केले. त्याने निकालाचा फोटोदेखील पोस्ट केला असून, त्यानुसार त्याला एकूण ९४२ मार्क मिळाले आहेत. 

रजतच्या आईचे ट्विट 

अर्जुनने कधीही हार मानली नाही...धृतराष्ट्राने पांडवांना त्यांच्या हक्काच्या वाट्यापासून वंचित ठेवले होते...पाच गावांची मागणी करूनही वनवास दिला; पण अर्जुनने धैर्याने लढा दिला आणि तो यशस्वी झाला. म्हणून अर्जुना उठ आणि यशाच्या लढाईत जा. 

कोण आहे रजत 

जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात जन्मलेला रजत जम्मूमध्ये मोठा झाला. पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज, चंडीगडमधून सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलेल्या रजत संबियालने हा माझा सहावा आणि शेवटचा प्रयत्न होता. मी कधीच शेवटच्या फेरीपर्यंत पोहोचलो नव्हतो; पण यावेळी मी सर्व फेऱ्या पूर्ण केल्या आणि शेवटी निकाल अनुकूल येईल अशी आशा होती, असे सांगितले.

Web Title: A mother never lets her child down; See the story of Rajat of Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.