3 मुलांच्या आईचं 19 वर्षाच्या भाच्यावर जडलं प्रेम; पतीपासून घटस्फोट न घेताच गेली पळून
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 01:53 PM2022-12-21T13:53:09+5:302022-12-21T13:53:40+5:30
राजस्थानमधील चुरू येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली : राजस्थानमधील चुरू येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे 3 मुलांची आई तिच्या 19 वर्षीय भाच्याच्या प्रेमात पडली. भाच्याच्या प्रेमात वेडी झालेल्या मामीने 3 मुलांना सोडून त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही आता लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत आहेत. यापुढेही त्यांना एकत्र राहायचे आहे. त्यासाठी कायद्याचा आधार घेण्यासाठी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून सुरक्षेची विनंती देखील केली. महिलेच्या आई-वडिलांना आणि सासरच्या मंडळींना या प्रेमसंबंधाची माहिती मिळताच त्यांनी दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती.
प्रेमी युगुलाने दिलेल्या माहितीनुसार, ते दोघे मागील चार वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत आहेत. वर्षभरापूर्वी महिलेने हा प्रकार घरच्यांना सांगितला असता पती आणि कुटुंबीयांनी तिला मारहाण केली. पुढे दोघांच्या प्रेमप्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर 19 डिसेंबर रोजी ही महिला सासरच्या मंडळींना न सांगता रतनगड येथे प्रियकर भाच्याकडे पोहोचली. त्यानंतर दोघांनी सोमवारी रतनगड न्यायालयातून त्यांच्या नात्याचा दाखला तयार करून घेतला.
11 वर्षांपूर्वी महिलेचे झाले होते लग्न
संबंधित महिला चुरू येथील रहिवासी असल्याचे तिने सांगितले. तिचे लग्न 11 वर्षांपूर्वी सीकर येथील तरुणाशी झाले होते. साडेचार वर्षांपूर्वी त्याचा भाचा सीकर येथे मामाकडे आला होता. तो रतनगडचा रहिवासी आहे. यादरम्यान दोघांमधील चर्चेचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले. मात्र नातेवाईकांना ही बाब समजताच एकच खळबळ माजली. महिलेने सांगितले की, पतीने तिला मारहाण केली आणि भाचाच्या संपर्कात राहायचे नाही असे सांगितले.
प्रियकर भाचाने प्रेयसी मामीला हॉटेलात ठेवले
मामी आणि भाचाचे प्रेमकरण सर्वांसमोर येताच त्यांच्या घरच्यांनी प्रेमी युगुलावर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली. पण भाच्याच्या प्रेमात वेडी झालेल्या मामीने १९ डिसेंबर रोजी पती आणि मुलांना सोडून पळ काढला. ती रतनगड येथे प्रियकर भाच्याजवळ गेली. तिथे तिला भाच्याने एका हॉटेलमध्ये ठेवले. तिथे राहताना त्यांनी लिव्ह इन प्रमाणपत्र दाखवले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"