हिंदू प्रियकरासोबत लग्न करत शबनमची बनली शिवानी; २ पती, ३ पोटच्या मुलांनाही सोडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:52 IST2025-04-08T13:52:32+5:302025-04-08T13:52:53+5:30
ही अनोखी लव्ह स्टोरी सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. धर्म वेगळे, वयात बरेच अंतर इतकेच काय तर प्रेयसी विवाहित महिला होती

हिंदू प्रियकरासोबत लग्न करत शबनमची बनली शिवानी; २ पती, ३ पोटच्या मुलांनाही सोडलं
अमरोहा - उत्तर प्रदेशातील अमरोहा इथं ३ मुलांची आई मुस्लीम महिला शबनमनं तिच्या दुसऱ्या पतीला सोडून तिसऱ्यांदा हिंदू प्रियकरासोबत मंदिरात लग्न केले. बारावीत शिकणाऱ्या मुलावर शबनमचा जीव जडला. त्याच्या प्रेमापोटी तिने पोटच्या ३ मुलांनासह पतीलाही सोडले. आता हिंदू प्रियकरासोबत लग्न करून तिने शबनम नाव बदलून शिवानी ठेवलं आहे. या प्रकाराची सगळीकडेच चर्चा सुरू झाली आहे.
अमरोहा येथे राहणाऱ्या शबनमनं आतापर्यंत २ निकाह केले आहेत. पहिला निकाह अलीगड येथे झाला. मात्र ते लग्न तुटल्यानंतर तिने दुसरा निकाह ८ वर्षापूर्वी अमरोहाच्या सैद नगरी येथे केला. लग्नानंतर तिला ३ मुलेही आहेत. परंतु १ वर्षापूर्वी एका रस्ते अपघातात तिचा पती गंभीर जखमी झाला. त्यानंतरच्या काळात शबनमचे संबंध शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन युवकासोबत जुळले. हा युवक १२ वीत शिकत असून तो हिंदू आहे. युवक आणि शबनममध्ये इतके संबंध तयार झाले की महिला पतीसह तिच्या मुलांनाही सोडण्यास तयार झाली. शबनमने तिच्या दुसऱ्या पतीसोबत तलाक घेतला आहे.
लव्ह मॅरेजला पंचायतीचा ग्रीन सिग्नल
ही अनोखी लव्ह स्टोरी सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. धर्म वेगळे, वयात बरेच अंतर इतकेच काय तर प्रेयसी विवाहित महिला होती. तरीही दोघांच्या लव्ह स्टोरीत फार काही समस्या आली नाही. लग्नानंतर दोघांचा व्हिडिओ व्हायरल झाला. आम्ही दोघे आनंदी आहोत. आमच्या मर्जीने आम्ही हे लग्न केल्याचं त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे लोकांच्या सहमतीने पंचायतीनेही या लग्नाला हिरवा कंदील दाखवला.
मॉर्निंग वॉकला झाली भेट
या दोघांमधील प्रेम कहाणीची सुरुवात मॉर्निंग वॉकपासून झाली. १७ वर्षीय अल्पवयीन युवक रोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडत होता. त्याचवेळी त्याची ओळख शबनमसोबत झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर हळूहळू हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेत एका मंदिरात लग्नही केले.
२ लग्नानंतर तिसरं लग्न
शबनमची शिवानी बनलेल्या तिच्या आधीच्या पतीने नाराजी व्यक्त करत माझा विश्वासघात केल्याचं म्हटलं. तिने माझा विश्वास मोडला, माझी फसवणूक केली आहे. खुदा तिला कधीही माफ करणार नाही. आता मी माझ्या ३ मुलींवर तिची सावलीही पडू देणार नाही असं पती तौफीक याने म्हटलं आहे.