"१९ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या विमानाने..."; खलिस्तानी दहशतवादी पन्नूची व्हिडिओद्वारे धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 08:58 PM2023-11-04T20:58:51+5:302023-11-04T21:20:35+5:30

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.

A new video of Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannu has surfaced. | "१९ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या विमानाने..."; खलिस्तानी दहशतवादी पन्नूची व्हिडिओद्वारे धमकी

"१९ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या विमानाने..."; खलिस्तानी दहशतवादी पन्नूची व्हिडिओद्वारे धमकी

नवी दिल्ली: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्याने १९ नोव्हेंबर रोजी एअर इंडियाने प्रवास करण्याची योजना आखत असलेल्या लोकांना धमकी दिली आहे. तसेच याच दिवशी भारतात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय वन डे वर्ल्ड कपचा अंतिम सामना होणार आहे, असंही पन्नने म्हटलं आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना पन्नू म्हणाला की, १९ नोव्हेंबरला एअर इंडियाने प्रवास करू नका, अन्यथा तुमच्या जीवाला धोका होईल. तसेच दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळ १९ नोव्हेंबरला बंद राहील आणि त्याचे नाव बदलले जाईल, असा दावाही पन्नूने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

पन्नूविरोधात देशभरात 16 गुन्हे दाखल आहेत

शीख फॉर जस्टिस संघटनेचा प्रमुख पन्नू हा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. त्याच्यावर देशभरात 16 गुन्हे दाखल आहेत. दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि उत्तराखंडमधील खलिस्तानी चळवळीसंदर्भात त्याच्यावर हे गुन्हे दाखल आहेत. पंजाबच्या सरहिंदमध्ये यूएपीए अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृतसरमध्ये यूएपीए अंतर्गत 4, दिल्लीत यूएपीए अंतर्गत 4, गुरुग्राममध्ये यूएपीए अंतर्गत, एनआयएद्वारे यूएपीए अंतर्गत, धर्मशालामध्ये यूएपीए अंतर्गत केस दाखल आहेत. अशाप्रकारे, त्याला UAPA म्हणजेच बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत एकूण 9 प्रकरणांमध्ये आरोपी मानले गेले आहे.

दहशतवादी पन्नू कोण आहे?

गुरपतवंत सिंग पन्नूचा जन्म पंजाबमध्ये झाला. कधी तो कॅनडा तर कधी अमेरिकेत राहतो. बाहेरून भारतात दहशतवादी हल्ले करण्याची धमकी दिली. कॅनडात स्थायिक झालेल्या हिंदूंना धमकावले. आणि हे सर्व तो उघडपणे करतो. पन्नू याचा जन्म 14 फेब्रुवारी 1967 रोजी झाला. पन्नूचे वडील पंजाबमध्ये एका कंपनीत काम करत होते. त्याला एक भाऊही आहे, जो परदेशात राहतो. त्याचे आई-वडील मरण पावले आहेत. पन्नू यांनी पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. तो सध्या अमेरिकेत कायद्याची प्रॅक्टिस करत आहे. पन्नू यानी 2007 मध्ये 'सिख फॉर जस्टिस' ही संघटना स्थापन केली होती. जुलै 2020 मध्ये भारताने पन्नूला दहशतवादी घोषित केले होते. पन्नू आयएसआयच्या मदतीने खलिस्तान मोहीम चालवत आहे.

Web Title: A new video of Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannu has surfaced.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.