वेगावरचे नियंत्रण सुटले अन् बाईकला मागून दिली धडक; चिमुकल्याने डोळ्यांदेखत वडिलांना गमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 12:05 PM2023-06-25T12:05:49+5:302023-06-25T12:06:15+5:30

तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

a person died and his minor son was injured after a traveller vehicle hit their two-wheeler from behind near the KG Chavadi check post today, Tamil Nadu | वेगावरचे नियंत्रण सुटले अन् बाईकला मागून दिली धडक; चिमुकल्याने डोळ्यांदेखत वडिलांना गमावले

वेगावरचे नियंत्रण सुटले अन् बाईकला मागून दिली धडक; चिमुकल्याने डोळ्यांदेखत वडिलांना गमावले

googlenewsNext

तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला आहे. प्रवासी वाहनाने दुचाकीस्वाराला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार झाकीर हुसैन यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर झाकीर यांचा अल्पवयीन मुलगा गंभीररित्या जखमी आहे. लक्षणीय बाब म्हणजे ही धडक एवढी गंभीर होती की, मोटारसायकल विंडशिल्डवर आदळून आत शिरली. 
 
दरम्यान, केजी चावडी चेकपोस्टवर ही घटना घडल्याचे कोईम्बतूर पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. खरं तर या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काहीसे वेगळे पाहायला मिळते आहे, कारण प्रत्यक्षात समोरून येणाऱ्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिली अन् भीषण अपघात झाला. टक्कर होताच दुचाकी हवेत उडाली आणि विंडशील्डवर आदळली. सध्या पोलीस तपास करत असून तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण स्षष्ट होईल. 

धडक मारणाऱ्या कारचा वेग जास्त असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. तसेच वेगावर नियंत्रण न राहिल्याने मोटारसायकल आणि कारमध्ये हा अपघात झाला. वृत्तसंस्था एएनआयने या अपघाताचे काही फोटो शेअर केले आहेत, ते पाहून हा अपघात किती भीषण होता हे लक्षात येते. 

Web Title: a person died and his minor son was injured after a traveller vehicle hit their two-wheeler from behind near the KG Chavadi check post today, Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.