योगी आदित्यनाथांचा जबरा फॅन, भेटण्यासाठी राजस्थानहून पायी पोहोचला गोरखपूरला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 04:15 PM2022-03-18T16:15:39+5:302022-03-18T17:03:37+5:30
Chief Minister Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांच्याप्रति निष्ठा असलेले राजस्थानचे मामचंद आनंद हे पायीच त्यांना भेटण्यासाठी गोरखनाथ मंदिरात पोहोचले.
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. योगी आदित्यनाथ यांच्याप्रति निष्ठा असलेले राजस्थानचे मामचंद आनंद हे पायीच त्यांना भेटण्यासाठी गोरखनाथ मंदिरात पोहोचले.
मामचंद आनंद यांच्यावर नाथपंथ आणि योगी आदित्यनाथ यांचा खूप प्रभाव आहे. ते पंथात सामील होऊन अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी योगी आदित्यनाथ यांचे मार्गदर्शन घेत आहेत. जयपूरचे रहिवासी असलेले मामचंद आनंद हे व्यवसायाने ड्रायव्हर आहेत. ते 3 मुलांचे वडील आहेत आणि आता त्यांना संन्यासी जीवनात येऊन अध्यात्माची गूढ रहस्ये समजून घ्यायची आहेत.
मामचंद आनंद म्हणतात की, शिवावतारी गुरु गोरक्षनाथद्वारे प्रवर्तित नाथपंथाचा त्यांच्यावर खूप प्रभाव आहे. त्यांच्या मते यामागे पंथ कारणीभूत आहे आणि सध्या गोरखनाथ मंदिराचे पीठाधीश्वर योगी आदित्यनाथ हेही मुख्यमंत्री या नात्याने पंथाचे ध्येय पूर्ण करत आहेत.
जयपूर येथून चालण्यास सुरुवात केली, जेणेकरून त्यांना त्यांच्या नवीन साधना मार्गावर त्यांची भक्ती दाखवता येईल. योगी आदित्यनाथ यांच्या भेटीनंतर त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळेल, अशी मामचंद यांना आशा आहे.
मुख्यमंत्री योगी यांच्याकडून होळीच्या शुभेच्छा!
दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी यांनी होळीच्या शुभेच्छा देत रंग, उत्साह आणि जल्लोषाचा हा सण सभ्यतेने साजरा केला पाहिजे, असे सांगितले. उत्साहात संवेदना गमावू नका, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. होळीच्या दिवशी सर्वांच्या भावनांची काळजी घ्या. जर एखाद्या व्यक्तीला आरोग्य किंवा कौटुंबिक कारणांमुळे रंग खेळायचे नसतील तर त्याच्यावर रंग लावू नका. घाण फेकू नका किंवा कोणाच्याही डोळ्यांना इजा करू नका. होळीचा सण हा त्या शाश्वत संस्कृतीचा एक भाग आहे, ज्याने जगाला वसुधैव कुटुंबकम आणि सर्वे भवन्तु सुखिनरुचा मंत्र दिला आहे.