भाजप, बीआरएस आणि एमआयएम यांची छुपी युती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 08:18 AM2023-11-20T08:18:21+5:302023-11-20T08:45:17+5:30
काॅंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा आरोप
हैदराबाद : तेलंगणामध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस), असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम आणि भाजप यांच्यात छुपी युती आहे. ते एकमेकांसाठी काम करत असल्याची टीका काॅंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केली. खानापूर येथे त्या बोलत होत्या.
संसदेत बीआरएसने एनडीएला पाठिंबा दिला होता. एमआयएम अनेक राज्यांमध्ये निवडणुकीत लढवितात, पण तेलंगणामध्ये केवळ ९ जागांवरच का लढत आहेत, असा सवालही प्रियंका यांनी उपस्थित केला.
तेलंगणात ईडी, सीबीआय नाही
केंद्र सरकारच्या ईडी, सीबीआयसारख्या तपास संस्था काॅंग्रेस नेत्यांकडे वारंवार चौकशीला येतात. परंतु, कालेश्वरम सिंचन योजनेतील बीआरएस सरकारच्या भ्रष्टाचाराची चौकशी का करत नाहीत, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.