सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! २१ जणांना अटक; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश, ५ मुलींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 03:22 PM2024-05-16T15:22:31+5:302024-05-16T15:28:43+5:30

पोलिसांनी बाल तस्करी आणि सेक्स रॅकेटवर कारवाई केली आहे.

A sex racket has been busted in Arunachal Pradesh and it has been revealed that senior officials of the state are involved  | सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! २१ जणांना अटक; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश, ५ मुलींची सुटका

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! २१ जणांना अटक; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश, ५ मुलींची सुटका

मोठ्या कालावधीपासून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात अरूणाचल प्रदेशच्या पोलिसांना अखेर यश आले. पोलिसांनी बाल तस्करी आणि सेक्स रॅकेटवर (Crackdown On Child Trafficking And Sex Racket) कारवाई केली आहे. या कारवाईत २१ जणांना अटक करण्यात आली आहे. खरे तर आरोपींमध्ये बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अटक केलेल्यांमध्ये पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) आणि आरोग्य सेवा संचालनालयातील उपसंचालकांसह अनेक सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मागील दहा दिवसांत राजधानी इटानगर आणि आसपासच्या तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून पोलिसांनी पाच मुलींची सुटका केली आहे.

सेक्स रॅकेटच्या जाळ्यातून सुटका करण्यात आलेल्या पाच मुलींपैकी एक १० वर्षांची, एक १२ वर्षांची आणि तीन मुलींचे वय १५ आहे. सर्व पाच मुलींची आसाममधील गावांमधून तस्करी करून त्यांना इटानगर येथे आणण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की, दहा आणि बारा वर्षांच्या दोन मुलींची वयाच्या आठव्या वर्षी इटानगर येथे तस्करी करण्यात आली होती.

२१ जणांना अटक
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या २१ जणांपैकी १० जणांवर तस्करी करणे, ग्राहकांची मागणी करणे आणि पीडितांना ग्राहकांकडे नेण्याचे आरोप आहेत. उर्वरित ११ लोकांची 'ग्राहक' म्हणून ओळख पटली आहे, ज्यांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे, अशी माहिती वृत्तसंस्था इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. 

स्थानिक पोलिसांनी सांगितले की, आम्हाला ४ मे रोजी लहान मुलींची तस्करी आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळीची माहिती दिली. प्राथमिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. शेजारच्या राज्यांमधून अल्पवयीन मुलींना आणले जात असल्याचे निदर्शनास आले. मग २ ठिकाणी छापे टाकून ४ मुलींना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांना ही टोळी देखील सापडली. या टोळीचे नेतृत्व दोन बहिणी करत होत्या, एक पुष्पांजली, जी इटानगरमध्ये ब्युटी पार्लर चालवत होती आणि दुसरी जी मूळची आसामच्या धेमाजी जिल्ह्यातील आहे ती मदत करत होती. 

Web Title: A sex racket has been busted in Arunachal Pradesh and it has been revealed that senior officials of the state are involved 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.