रोजंदारी कामगारांच्या आत्महत्यांमध्ये माेठी वाढ; महाराष्ट्रात ५२७० जणांना संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 11:36 AM2023-04-24T11:36:32+5:302023-04-24T11:38:06+5:30

तामिळनाडू आणि महाराष्ट्रात प्रमाण अधिकार

A sharp rise in suicides of daily wage workers; 5270 people lost their lives in Maharashtra | रोजंदारी कामगारांच्या आत्महत्यांमध्ये माेठी वाढ; महाराष्ट्रात ५२७० जणांना संपवले जीवन

रोजंदारी कामगारांच्या आत्महत्यांमध्ये माेठी वाढ; महाराष्ट्रात ५२७० जणांना संपवले जीवन

googlenewsNext

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : रोजंदारी कामगारांच्या आत्महत्यांमध्ये ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत तामिळनाडू, महाराष्ट्र आघाडीवर आहेत.देशात २०२१ मध्ये ४१६७२ आत्महत्या झाल्या असून, त्यापैकी तामिळनाडूत ७६७३ व महाराष्ट्रात ५२७० आत्महत्या झाल्या. यातील अधिक चिंताजनक बाब म्हणजे तामिळनाडू व महाराष्ट्रात २०१७ ते २०२१ या पाच वर्षांच्या कालावधीत या आत्महत्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. २०१७मध्ये तामिळनाडूत ५६२४ व महाराष्ट्रात ३६६९ आत्महत्या झाल्या. आत्महत्या करणारांची संख्या वाढत राहिली आहे. 

हाच कल भाजपशासित मध्य प्रदेश, गुजरातसह अनेक राज्यांत पाच वर्षे चिंतेचा राहिला. २०१७ मध्ये मध्य प्रदेशात ३०३९ व गुजरातेत २१३१ आत्महत्या झाल्या. २०२१ मध्ये मध्य प्रदेशात ४६५७ व गुजरातेत ३२०६ आत्महत्या झाल्या. दक्षिणेकडील आंध्र प्रदेश व तेलंगणा या दोन राज्यांमध्येही चित्र फारसे चांगले नव्हते. रोजंदारी कामगारांच्या २०२१ मध्ये आंध्रात ३०१४ तर तेलंगणात ४२२३ आत्महत्या झाल्या. प. बंगालमध्ये पाच वर्षांत रोजंदारी कामगारांच्या आत्महत्यांमध्ये घट झाली. राज्यात २०१७ मध्ये १४३८ तर २०२१ मध्ये ९२५ आत्महत्या झाल्या. 

  नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहारमध्ये २०२१ मध्ये २९ आत्महत्या झाल्या. माकपाशासित केरळमध्ये २०१७ मध्ये २६४३ आत्महत्या झाल्या होत्या. २०२१ मध्ये हीच संख्या २३१३ एवढी होती.

 रोजंदारी कामगारांच्या आत्महत्या देशात वर्षानुवर्षे वाढतच असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालय चिंतेत आहे. 

राज्ये    २०१७    २०२१ 
तामिळनाडू    ५६२४    ७६७३ 
महाराष्ट्र    ३६६९    ५२७० 
तेलंगणा    २५०७    ४२२३ 
गुजरात    २१३१    ३२०६ 
आंध्र प्रदेश    १३९७    ३०१४

Web Title: A sharp rise in suicides of daily wage workers; 5270 people lost their lives in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.