हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 12:44 PM2024-09-20T12:44:07+5:302024-09-20T12:47:12+5:30

Odisha Crime News: छेडछाडीविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या लष्करी अधिकारी आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलिसांनी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना ओदिशामध्ये घडली आहे. तसेच पीडित महिलेने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराची जी माहिती दिली आहे संताप आणणारी आहे.

A shocking incident happened in the police station with the future wife of an army officer.   | हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  

हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  

छेडछाडीविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या लष्करी अधिकारी आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलिसांनी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना ओदिशामध्ये घडली आहे. तसेच पीडित महिलेने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराची जी माहिती दिली आहे संताप आणणारी आहे. या लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीने पोलिसांनी तिचे हातपाय बांधून मारहाण केल्याचा. तसेच पँट उतरवून प्रायव्हेट पार्ट दाखवण्याची आणि बलात्काराची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.

ही घटना ओदिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वर येथे घडली आहे. तसेच पोलिसांच्या दंडेलशाहीची शिकार झालेला लष्करी अधिकारी हा शीख रेजिमेंटचा भाग आहे. तसेच त्याची होणारी पत्नी भुवनेश्वरमध्ये एक रेस्टॉरंट चालवते. घडलेल्या प्रकाराबाबत माहिती देताना पीडित महिलेने सांगितले की, रात्री सुमारे १ वाजता मी माझा रेस्टॉरंट बंद करून घरी परतत होते. तेव्हा काही तरुणांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले. आम्ही पोलिसांकडून मदत घेण्याचा विचार केला, तसेच थेट भरतपूर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलो.  

लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीने पुढे सांगितले की,  आम्ही भरतपूर पोलीस ठाण्यात पोहोचलो तेव्हा तिथे सिव्हिल ड्रेसमध्ये एक महिला कॉन्स्टेबल उपस्थित होती. आम्ही तिला एफआयआर दाखल करून घेत आरोपींना पकडण्यासाठी गस्ती वाहन पाठवण्याची विनंती केली. मात्र आमची मदत करण्याऐवजी सदर महिला कॉन्स्टेबलने आमच्यासोबतच गैवर्तन केले.

त्यानंतर काही वेळाने इतर काही पोलीस कर्मचारी तिथे पोहोचले. त्यांनी आम्हाला तक्रार नोंदवण्यास सांगितले. मात्र कुठल्या तरी कारणावरून ते भडकले. त्यांनी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला कोठडीत टाकले. तेव्हा मी हे बेकायदेशीर कृत्य असल्याचे सांगितले. तसेच पोलीस लष्कराच्या अधिकाऱ्याला अशा प्रकारे कोठडीत डांबू शकत नाही, असे सांगितले. मात्र मी असं बोलताच तिथे असलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी जेव्हा माझी मान पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी त्यांच्या हाताचा चावा घेतला, असे या पीडित महिलेने सांगितले. 

यावेळी आणखी गंभीर आरोप करताना पीडित महिलेने सांगितले की, मला मारहाण केल्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मला हात-पाय बांधून एका खोलीत कोंडले. काही वेळावे एका पुरुष पोलिसाने दरवाजा उघडला. त्याने माझ्या छातीवर लाथा मारल्या. माझी पँट उतरवली आणि मला त्याचा प्रायव्हेट पार्ट दाखवू लागला, असा आरोप या पीडित महिलेने केला. तसेच या पोलीस कर्मचाऱ्याने आपल्यावर बलात्कार करण्याची धमकी दिल्याचाही दावा केला. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला कर्मचारी ही एक वकील आणि उद्योजक आहेत. तसेच तिचे वडील हे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. 

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर डीएसपी नरेंद्र कुमार बेहरा यांच्या नेतृत्वाखालील क्राइम ब्रँचच्या पथकाने घटनेच्या चौकशीसाठी भरतपूर पोलीस ठाण्याचा दौरा केला आहे. या प्रकरणी भरतपूर पोलीस ठाण्यातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच या घटनेची स्वत: दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने डीजीपींकडून कारवाईचा अहवाल मागवला आहे.  

Web Title: A shocking incident happened in the police station with the future wife of an army officer.  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.