घरातून पळाल्या लेस्बियन; एक अल्पवयीन मुलगी, तर दूसरी २ मुलांची आई!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 08:18 PM2022-12-26T20:18:27+5:302022-12-26T20:20:43+5:30

झारखंडमधील धनबादमधून महिला आणि अल्पवयीन मुलीच्या प्रेमाची धक्कादायक घटना समोर आली आहे.

A shocking incident of love between a woman and a minor girl has come to light from Dhanbad in Jharkhand. | घरातून पळाल्या लेस्बियन; एक अल्पवयीन मुलगी, तर दूसरी २ मुलांची आई!

घरातून पळाल्या लेस्बियन; एक अल्पवयीन मुलगी, तर दूसरी २ मुलांची आई!

Next

झारखंडमधील धनबादमधून महिला आणि अल्पवयीन मुलीच्या प्रेमाची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेचा घटस्फोट झाला असून तिला दोन मुले आहेत. दोघेही १५ डिसेंबर रोजी घरातून पळून गेले. याप्रकरणी संबंधित मुलीच्या आईने सोमवारी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला. तसेच या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

अजून सुगावा लागला नाही-

विशेष म्हणजे धनबादच्या भुली पोलीस स्टेशन परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी १५ डिसेंबर रोजी एका विवाहित महिलेसोबत पळून गेली होती. ती बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांमध्ये नाराजी आहे. दोघांचाही खूप शोध घेतला पण आतापर्यंत काही सुगावा लागला नाही.

दोघे यापूर्वी एकदा पळून गेले होते-

या मुलीच्या आईने पोलीस ठाणे गाठून आपल्या मुलीच्या पुनर्प्राप्तीची याचना केली. तसेच योग्य कारवाई होत नसल्याचे पाहून सोमवारी त्यांनी हातात मुलगी व महिलेचा फोटो घेऊन ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. तिच्या आईने सांगितले की, महिला आणि मुलीला लग्न करायचे आहे. याआधी दोघेही एकदा पळून गेले आहेत.

विवाहित महिला मुलीला घेऊन गेली-

या घटनेबाबत धनबादचे डीएसपी अमर कुमार पांडे म्हणाले की, एका महिलेने तक्रार दाखल केली आहे की, तिची अल्पवयीन मुलगी एका विवाहित महिलेसोबत पळून गेली आहे. या संदर्भात चौकशी सुरु आहे. दोघांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमागील कारण मानवी तस्करी आहे की समलैंगिक विवाह, हे फरार तरुणी व महिलेची चौकशी केल्यानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. 

Web Title: A shocking incident of love between a woman and a minor girl has come to light from Dhanbad in Jharkhand.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.