Shoe Theft: धावत्या ट्रेनमध्ये सिटखालून चोरीस गेलं चप्पल, आता दोन राज्यांतील पोलीस घेताहेत शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 12:17 PM2022-11-11T12:17:23+5:302022-11-11T12:18:35+5:30
Shoe Theft In Train: धावत्या ट्रेनमधील सिटखालून एका व्यक्तीचं चप्पल चोरीस गेलं असून, याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोलीस या चपला आणि चप्पल चोरी करणाऱ्या चोराचा शोध घेत आहेत.
मुझफ्फरपूर - धावत्या ट्रेनमधील सिटखालून एका व्यक्तीचं चप्पल चोरीस गेलं असून, याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोलीस या चपला आणि चप्पल चोरी करणाऱ्या चोराचा शोध घेत आहेत. पोलिसांनी चप्पल चोरी केल्या प्रकरणी झीरो एफआयआर नोंद केली आहे. आता सोशल मीडियावर याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. पीडित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे त्याने सिटखाली पाहिलं तर चपला चोरीस गेल्या होत्या. त्यानंतर त्याने रेल्वे मदत अॅपवर तक्रार नोंद केली.
या प्रकरणातील पीडिताचं नाव राहुल कुमार झा असं आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार जयनगर क्लोन स्पेशल ट्रेन नंबर ०४६५२ च्या बी-४ डब्यातील ५१ नंबर सिटवर बसला होता. तो अंबाला स्टेशनवरून प्रवास करत होता. या दरम्यान, त्याच्या चपला चोरीस गेल्या. सहसा किरकोळ चोरीच्या तक्रारी लोकांकडून दाखल केल्या जात नाहीत. मात्र राहुल कुमार झा याने चपला चोरीस गेल्याची तक्रार नोंदवली.
मुझफ्फरपूर रेल्वे पोलीस स्टेशनचा रेफरन्स देत राहुल कुमार झा याने मुरादाबादमध्ये तक्रार दाखल केली आहे. आता चोरीस गेलेल्या चपला आणि चोराला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले. तक्रारीमधील नोंदीनुसार राहुल कुमार झा याच्या चपला निळ्या रंगाच्या असून, त्या कॅम्पस कंपनीच्या आहेत.