संसदेत प्रवेश करताना लागेल स्मार्ट कार्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 07:51 AM2024-01-29T07:51:04+5:302024-01-29T07:51:26+5:30
Indian Parliament: संसद भवन परिसरात अभ्यागतांच्या प्रवेशासाठी नवीन व्यवस्था करण्यात आली आहे. हे बदल ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून लागू होतील. ही प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे.
नवी दिल्ली - संसद भवन परिसरात अभ्यागतांच्या प्रवेशासाठी नवीन व्यवस्था करण्यात आली आहे. हे बदल ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून लागू होतील. ही प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे. याअंतर्गत संसदेचे कामकाज पाहण्यासाठी पाहुण्याला क्यूआर कोड घ्यावा लागेल.
संसदेत येताना अभ्यागतांना क्यूआर कोड आणि आधार कार्डची प्रिंट आऊट आणावी लागेल. त्यानंतर त्याला स्मार्ट कार्ड दिले जाईल. त्याला टॅप आणि बायोमेट्रिक तपासणी केल्यानंतरच तो संसदेत प्रवेश करू शकेल.
संसदेत जाताना त्याला त्याचे स्मार्ट कार्ड जमा करावे लागेल, तसे न केल्यास ते आपोआप ब्लॉक होऊन काळ्या यादीत टाकले जातील. त्यानंतर तो व्यक्ती पुन्हा संसदेच्या आवारात प्रवेश करू शकणार नाही.
१३ डिसेंबरच्या घटनेनंतर हा बदल करण्यात आला आहे. त्यावेळी प्रेक्षक गॅलरीतून दोन व्यक्तींनी सभागृहात उड्या मारल्या आणि धुराचे डबे पेटवून घोषणाबाजी केली होती.