जवानाच्या विधवेने दुसरा विवाह केला तरीही मिळणार पेन्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 12:13 PM2023-01-20T12:13:39+5:302023-01-20T12:14:39+5:30

पंजाब व हरयाणा हायकोर्टाने दिला आदेश

A soldier's widow will get pension even if she marries a second time | जवानाच्या विधवेने दुसरा विवाह केला तरीही मिळणार पेन्शन!

जवानाच्या विधवेने दुसरा विवाह केला तरीही मिळणार पेन्शन!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

चंडीगड: लष्करी जवानाच्या विधवेने पतीच्या भावाबरोबर दुसरा विवाह केला तरी तिला पेन्शनचा अधिकार आहे, असे आदेश पंजाब व हरयाणा हायकोर्टाने दिले आहेत.

याचिका दाखल करणाऱ्या महिलेचा विवाह १९७४ मध्ये महेंद्र सिंह यांच्याशी झाला होता. एका वर्षाने त्यांना एक मुलगी झाली. महेंद्र सिंह यांना वायुदलात नियुक्ती मिळाली होती. १९७५ मध्ये सेवेच्या कालावधीत त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी सुखजीत कौर यांना पेन्शन मिळाली. या कालावधीत सुखजीत कौर यांनी पतीच्या लहान भावासोबत विवाह केला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर १९८२ मध्ये केंद्र सरकारने सुखजीत कौर यांची पेन्शन रोखली.

कॅटने २०१६ मध्ये  याचिका फेटाळल्यानंतर सुखजीत यांनी पंजाब व हरयाणा हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, लष्करी सेवेच्या कालावधीत मृत्यू झालेल्या जवानाच्या विधवेबाबत भेदभाव केला जाऊ नये. याबरोबरच बंद केलेली पेन्शन सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले.

Web Title: A soldier's widow will get pension even if she marries a second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.