देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष लष्करी पदक जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 05:51 AM2022-08-15T05:51:51+5:302022-08-15T05:52:17+5:30

Independence Day : देशाच्या स्वातंत्र्याला २५ वर्षे तसेच ५० वर्षे पूर्ण झाली, त्यावेळीही अशीच विशेष पदके तयार करण्यात आली होती.

A special military medal is issued to mark the completion of 75 years of independence of the country | देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष लष्करी पदक जारी

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष लष्करी पदक जारी

googlenewsNext

नवी दिल्ली :  स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवानिमित्त एक विशेष पदक केंद्र सरकारने तयार केले आहे. तीनही सैन्यदलांतील सर्व जवानांना हे पदक देण्यात येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याला २५ वर्षे तसेच ५० वर्षे पूर्ण झाली, त्यावेळीही अशीच विशेष पदके तयार करण्यात आली होती.
लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तयार केलेल्या विशेष पदकाबाबत राष्ट्रपतींची अधिसूचना जारी झाली आहे. या नव्या पदकावर पुढील बाजूस अशोक स्तंभ व मागील बाजूस अशोक चक्र असणार आहे. या पदकाला तिरंगी रिबीन लावलेली असेल. त्या पदकावर देशाचा ७५वा स्वातंत्र्यदिन १९४७ ते २०२२ असा उल्लेख असणार आहे.

Web Title: A special military medal is issued to mark the completion of 75 years of independence of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.