डीपफेकविरोधात ७ दिवसांत कठोर कायदा येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 06:37 AM2024-01-17T06:37:00+5:302024-01-17T06:37:24+5:30
राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, केंद्र सरकारने डिजिटल क्षेत्रांत घडलेल्या घटनांबाबत तज्ज्ञांशी, अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
नवी दिल्ली : डीपफेकच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार येत्या सात ते आठ दिवसांत कडक स्वरूपाचे नियम लागू करण्याची शक्यता आहे. त्यासाठी माहिती-तंत्रज्ञान (आयटी) नियमांमध्ये सुधारणा करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. ही माहिती केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली.
राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, केंद्र सरकारने डिजिटल क्षेत्रांत घडलेल्या घटनांबाबत तज्ज्ञांशी, अधिकाऱ्यांशी चर्चा केली. माहिती-तंत्रज्ञान नियमांत येत्या सात-आठ दिवसांत सुधारणा करून ते लागू करण्यात येतील.