रॅगिंगने घेतला तेलंगणातील टॉपर विद्यार्थ्याचा जीव, सुसाईड नोटमध्ये लिहिले 'आई, बाबा माफ करा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 01:41 PM2022-11-13T13:41:06+5:302022-11-13T13:41:20+5:30
रॅगिंगच्या अनेक घटना समोर येत आहेत. देशात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्यावर रॅगिंग केले जात आहे. या रॅगिंगला कंटाळून काही विद्यार्थी आत्महत्या करतात.
रॅगिंगच्या अनेक घटना समोर येत आहेत. देशात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्यावर रॅगिंग केले जात आहे. या रॅगिंगला कंटाळून काही विद्यार्थी आत्महत्या करतात. तेलंगणामधून अशीच एक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थ्यांने रॅगिंगमुळे आत्महत्या केली आहे. या विद्यार्थ्यांची सुसाईट नोट सापडली आहे.
तेलंगणातील भैंसा शहरात ही घटना घडली आहे. येथे एका विद्यार्थ्याचा रॅगिंगच्या नावाखाली इतका छळ करण्यात आला की त्याने आत्महत्या केली. हा विद्यार्थी शहरातील अल्पसंख्याक गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालयाचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. फरहान नवाज (१७) असे त्याचे नाव आहे.
गिफ्टच्या नादात सव्वा लाख शिफ्ट... बँक लिपिकेला सायबर भामट्यांचा चुना!
या विद्यार्थ्याने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. सुसाईड नोटमध्ये तीन विद्यार्थ्यांनी अनेकदा त्याचा छळ केल्याचे त्याने लिहिले आहे. फरहान ज्युनियर कॉलेजमध्ये टॉपर होता, त्यामुळे लेक्चरर आणि प्रिन्सिपल यांचा तो लाडका होता.आरोपी विद्यार्थ्यांना हे आवडले नाही. याचा विद्यार्थ्यांना हेवा वाटायचा आणि नंतर ते फरहानवर अत्याचार करायचे. सुसाईड नोटमध्ये त्याने आपल्या आई-वडिलांची माफी मागितली आहे, आपण त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकलो नाही असं त्याने यात म्हटले आहे.
या विद्यार्थ्याने गेल्या आठवडाभरापासून शाळा प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचे त्याच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. सुसाईड नोटनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून कॉलेज प्रशासनाशीही चर्चा सुरू आहे. फरहान हा कॉलेज टॉपर होता आणि काहीतरी मोठं करायचं स्वप्न होतं. तो नेहमी अभ्यासात मग्न असायचा.
काही दिवसापूर्वी हैदराबादमधील एका विद्यार्थ्याचे असेच एक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये वरिष्ठांनी या विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हिमांक बन्सल असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. आरोपी विद्यार्थी ज्युनियर विद्यार्थ्यांना मारहाण करत असून धार्मिक घोषणा देत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत होते. विद्यार्थ्यावर एका विशिष्ट धर्माविरुद्ध टिप्पणी केल्याचा आरोप आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रॅगिंगच्या कलमान्वयेही गुन्हा दाखल केला आहे.