"मी खूप विचार केला पण...", आई-वडिलांना न रडण्याचं आवाहन; विद्यार्थ्यानं संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 05:47 PM2024-02-16T17:47:06+5:302024-02-16T17:49:24+5:30

मागील काही कालावधीपासून विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.

  A student studying polytechnic in Udaipur, Rajasthan has ended his life due to depression  | "मी खूप विचार केला पण...", आई-वडिलांना न रडण्याचं आवाहन; विद्यार्थ्यानं संपवलं जीवन

"मी खूप विचार केला पण...", आई-वडिलांना न रडण्याचं आवाहन; विद्यार्थ्यानं संपवलं जीवन

अभ्यासामुळे आलेले नैराश्य, वाढलेली स्पर्धा आणि ताण यामुळे मागील काही कालावधीपासून विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील उदयपूर शहरात गुरूवारी रात्री एका पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. मृत विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटही लिहिली होती. ज्यात लिहिले आहे की, मम्मी आणि पप्पा, कृपया मला माफ करा, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. एकुलता एक मुलगा हर्षवर्धनने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजात कुटुंबीयांना टाहो फोडला.

तो शिक्षणासाठी घरापासून लांब राहत होता. महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोलीत त्याने आत्महत्या करून जीवन संपवले. ही घटना उदयपूर शहरातील बारागाव पोलीस स्टेशन परिसरात घडली. राजसमंद जिल्ह्यातील देवगड येथील रहिवासी असलेला हर्षवर्धन विद्या भवन पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. हर्षवर्धन ११ फेब्रुवारीला घरी गेला होता आणि १४ फेब्रुवारीला कॉलेजला परतला होता. त्याने घरातून परतताना वडिलांना उर्वरित १५,००० रुपये कॉलेजची फी भरण्यास सांगितले होते.  
 
मृत हर्षवर्धनच्या खोलीजवळ राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने रात्री हर्षवर्धनच्या खोलीचा दरवाजा ठोठावला मात्र बराच वेळ झाला तरी त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांने वॉर्डनसह इतर विद्यार्थ्यांना याची माहिती दिली. सर्वांनी दरवाजा तोडून आत गेल्यावर हर्षवर्धन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

आई-वडिलांना न रडण्याचं आवाहन
विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्यानंतर स्थानिक बडगाव पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. यानंतर मृत विद्यार्थ्याने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यामध्ये हर्षवर्धनने लिहिले की, मम्मी, मरण्यापूर्वी मी खूप विचार केला, पण आता हे सगळं बघून मला काही कळत नाहीये. आता मला कॉलेजची फी भरावी लागेल, मला माहीत आहे. १५,००० रुपये भरणं ही मोठी गोष्ट नाही. पण मी तुझ्या अपेक्षेनुसार जगू शकलो नाही. माझ्यानंतर नेतलचे चांगले शिक्षण आणि लग्न करायचं हे माझं स्वप्न होतं, पण इच्छा असूनही मी ते स्वप्न पूर्ण करू शकत नाही. आई-बाबा कोणीच रडू नका कारण माझी तेवढी पातळी नाही. आता तुम्हा लोकांची अवस्था बघणे मला सहन होत नाही. आता मी थकलो आहे. तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. मला माफ करा.

Web Title:   A student studying polytechnic in Udaipur, Rajasthan has ended his life due to depression 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.