आसाममध्ये भीषण अपघात! बस-ट्रकच्या धडकेत १४ जणांचा मृत्यू, पिकनिकला जाताना घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 09:23 AM2024-01-03T09:23:37+5:302024-01-03T09:24:12+5:30

आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

A terrible accident in Assam 14 people died in a bus-truck collision, people were going for a picnic | आसाममध्ये भीषण अपघात! बस-ट्रकच्या धडकेत १४ जणांचा मृत्यू, पिकनिकला जाताना घडली घटना

आसाममध्ये भीषण अपघात! बस-ट्रकच्या धडकेत १४ जणांचा मृत्यू, पिकनिकला जाताना घडली घटना

आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात २७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असून, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

धक्कादायक! विम्याच्या पैशासाठी जवळच्या मित्राची हत्या, १ कोटी रकमेसाठी स्वत:च्या मृत्यूचा केला बनाव

मिळालेल्या माहितीनुसार, गोलाघाट जिल्ह्यातील डेरगावजवळील बलिजन गावात हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ४५ जण होते, ते पहाटे ३ वाजता आठखेलिया येथून बोगीबील पिकनिकला निघाले होते. यादरम्यान पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मार्गेरिटा येथून कोळसा भरती करणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. अपघातानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना जेएमसीएचमध्ये नेले, त्यापैकी अनेक प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.

यापूर्वी आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. येथे ११ सप्टेंबर २०२३ रोजी एका भीषण रस्ता अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले. शिवसागर जिल्ह्यातील काही लोक दिब्रुगडमधील शांतीपाडा येथे एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पुन्हा शिवसागरकडे निघाले होते. त्यानंतर लटकाटा येथे त्यांची कार एका ट्रकला धडकली. ट्रकला धडकल्यानंतर कार लगेचच उलटली. 

Web Title: A terrible accident in Assam 14 people died in a bus-truck collision, people were going for a picnic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.