कारची स्टेपनी बदलणाऱ्या लोकांना चिरडले, ६ जणांचा मृत्यू; हरियाणातील भीषण घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 11:01 AM2024-03-11T11:01:37+5:302024-03-11T11:02:50+5:30

सर्व मृत उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील दिल्ली सीमेजवळील एका सोसायटीतील रहिवासी होते. 

A terrible road accident took place in Haryana's Rewari late at night, in which 6 people were killed | कारची स्टेपनी बदलणाऱ्या लोकांना चिरडले, ६ जणांचा मृत्यू; हरियाणातील भीषण घटना

कारची स्टेपनी बदलणाऱ्या लोकांना चिरडले, ६ जणांचा मृत्यू; हरियाणातील भीषण घटना

नवी दिल्ली: हरियाणातील रेवाडी येथे रात्री उशिरा भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. सर्व मृत उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील दिल्ली सीमेजवळील एका सोसायटीतील रहिवासी होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या अजनारा ग्रीन सोसायटीत राहणारे काही लोक श्रीखाटू धामला गेले होते. सर्व लोक एकमेकांच्या शेजारी राहतात आणि इनोव्हा कार बुक करून दिल्लीहून निघाले होते. श्रीखाटू श्यामचे दर्शन घेतल्यानंतर सर्वजण गाझियाबादला परत जात होते. यावेळी रेवाडीहून धरुहेरा रस्त्याने जात असताना मसाणी गावाजवळ त्यांची कारचे टायर पंक्चर झाली. ड्रायव्हर आणि इतर पंक्चर झालेल्या स्टेपनीला बदलण्याचा प्रयत्न करत होते. काही लोक रस्त्याच्या कडेला गाडीजवळ बसले होते तर काही लोक गाडीच्या आत बसले होते. एसयूव्ही चालकाला पंक्चर झालेली गाडी दिसली नाही. त्यामुळे भीषण अपघात झाला. 

दुसरीकडे, एसयूव्हीमध्ये प्रवास करणारे लोक रेवाडी शहरातील रेल्वे कॉलनीत एका कौटुंबिक विवाह समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. हे कुटुंब तांदूळ भरून परतत होते. मसाणी गावाजवळ अंधारामुळे चालकाला पार्क केलेले वाहन दिसले नाही, त्यामुळे त्यांची थेट धडक झाली. वाहनात प्रवास करणारे ५ जण जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. मृतांमध्ये चार महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. अपघातातील जखमी खाटू श्यामला भेट देऊन परतत होते.

Web Title: A terrible road accident took place in Haryana's Rewari late at night, in which 6 people were killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.