भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पडली; सात मुलांसह १५ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 12:12 PM2024-02-24T12:12:18+5:302024-02-24T12:27:50+5:30
आसपासचे गावकरी आणि पोलीस मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.
उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी गावकरी आणि पोलीस मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.
माघ पौर्णिमेनिमित्त गंगेत स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटल्याने त्यावरून प्रवास करणाऱ्या १५ जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी १० वाजताच्या सुमारास कासगंजमधील पटियाली दरियावगंज रस्त्यावर एक अनियंत्रित ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पडली. ट्रॉलीमध्ये प्रवास करणाऱ्या सात मुले आणि आठ महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी एकच गोंधळ आणि आरडाओरडा झाला.
आसपासचे गावकरी आणि पोलीस मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. तलावातून वाचवण्यात आलेल्या भाविकांना पतियाळी येथील आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत १५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. हे भाविक एटा जिल्ह्यातील काहा गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे.