एका वर्षातच ट्विस्ट; गुजरातमध्ये आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 01:03 PM2023-12-13T13:03:07+5:302023-12-13T13:05:49+5:30

गुजरातमध्ये गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भूपत भायाणी यांनी आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवली

A twist within a year; 'AAP' MLA Bhupat Bhayani resigns in Gujarat, joins BJP | एका वर्षातच ट्विस्ट; गुजरातमध्ये आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, भाजपात प्रवेश

एका वर्षातच ट्विस्ट; गुजरातमध्ये आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, भाजपात प्रवेश

अहमदाबाद - देशातील ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपाने तयारीही सुरू केली आहे. त्यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं होमग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये यंदाच्या निवडणुकीतून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने शिरकाव केला होता. मात्र, भाजपाने केजरीवालांना धक्का दिलाय. गुजरातमधीलआपचेआमदार भूपत भायाणी यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांनी तो राजीनामा स्वीकारही केला आहे. 

गुजरातमध्ये गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भूपत भायाणी यांनी आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवली आणि जिंकली होती. नुकतेच गुजरातमध्ये भाजपाने सत्तेतील एक वर्ष पूर्ण केलं असतानाच केजरीवाल यांना धक्का दिलाय. आपने गुजरात विधानसभा निवडणुकीत ५ जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी, एका जागेवर भूपत भायाणी आमदार बनले होते, त्यांच्या राजीनाम्यामुळे गुजरातमध्ये आपचे संख्याबळ केवळ ४ झाले आहे. भायाणी यांच्या विसावदर मतदारसंघात आता पोटनिवडणुकीची घोषणा होईल. 

पाटीदार समाजाचे भूपत भायाणी यांना भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपा उमेदवार हर्षद राबडिया यांचा पराभव केला. विशेष म्हणजे हर्षद हे निवडणुकांच्या अगोदरच काँग्रेसमधून भाजपात आले होते. त्यामुळे, भयाणी यांच्या राजीनाम्यानंतर आता विसावदर मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. वीसावदर मतदारसंघात पाटीदार समजाचा वरचष्मा आहे, यापूर्वी गुजरातचे दिवंगत मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांनीही येथून प्रतिनिधित्व केलं आहे. 

दरम्यान, मी अगोदरपासूनच भाजपाचा कार्यकर्ता आहे, असे भयाणी यांनी राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले. 
 

Web Title: A twist within a year; 'AAP' MLA Bhupat Bhayani resigns in Gujarat, joins BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.