इथे माणुसकी हरली! चिमुकल्याच्या डोळ्यादेखत वडिलांना मारहाण; अंगावर काटा आणणारा video
By ओमकार संकपाळ | Published: August 10, 2023 07:38 PM2023-08-10T19:38:04+5:302023-08-10T19:38:37+5:30
चिमुकल्याच्या डोळ्यादेखत त्याच्या वडिलांना काही गुंड मारहाण करत असल्याचा हा थरार अंगावर काटा आणणारा आहे.
हे सोशल मीडियाचे युग आहे इथे कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. चिमुकल्याच्या डोळ्यादेखत त्याच्या वडिलांना काही गुंड मारहाण करत असल्याचा हा थरार अंगावर काटा आणणारा आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, वडील नेहमीप्रमाणे बाईकवरून मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात होते. शाळेजवळ आले असता त्यांनी बाईक थांबवली अन् गुडांनी चिमुकल्यासमोर त्याच्या वडिलांवर हल्ला चढवला. ही घटना पंजाबमधील मानसा येथील असल्याचे कळते.
दरम्यान, शाळेजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनेचा थरार कैद झाला आहे. आपल्या वडिलांना मारहाण होत असल्याचे पाहून मुलगा जोरजोरात रडू लागला. गुडांनी बाईक थांबताच मुलाला बाजूला नेले अन् त्याच्या वडिलांना लाठ्यांनी मारहाण केली. बघ्यांची संख्या देखील लक्षणीय होती पण गुडांचा रूद्रावतार पाहून मध्यस्थी करण्याचे कोणाचेच धाडस झाले नाही. बाईक शाळेजवळ येताच वडिलांनी बाईक थांबवली तेव्हा लगेच ४-५ गुंडांनी हल्ला केला आणि लाठ्या-रॉडने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. वडिलांना मारहाण होत असताना एका गुंडाने मुलाला सुरक्षितपणे दुचाकीवरून खाली उतरवले आणि नंतर त्याच्या वडिलांना काठीने मारहाण केली.
Visuals from Mansa where due to personal rivalry, six people broke both legs of a person who had come to drop his son off at school. They had a previous dispute as well, and earlier also an FIR under section 307 has been registered against them. pic.twitter.com/JEohspw5P8
— Gagandeep Singh (@Gagan4344) August 10, 2023
आरोपींवर गुन्हा दाखल
शाळेसमोर घडलेली ही हृदयद्रावक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेले अनेक पालक उपस्थित होते. गुंड आणि त्या व्यक्तीमध्ये काही कारणावरून वाद सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध आयपीसी ३०७ अर्थात हत्येचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.