VIDEO: हातात पिस्तुल घेऊन स्टेजवर नाचत होती डान्सर; व्हिडीओ व्हायरल होताच चिघळला वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 03:13 PM2022-10-04T15:13:51+5:302022-10-04T15:14:26+5:30
सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून सर्वांनाच धक्का बसत आहे, कारण हातात पिस्तुल घेऊन स्टेजवर डान्स करत असलेल्या एका डान्सरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरून प्रश्न उपस्थित केले जात आहे. खरं तर असा व्हिडीओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा व्हिडीओ यापूर्वी देखील समोर आल्या आहेत. यावरून बराच गदारोळ झाला आहे.
दरम्यान, व्हायरल होत असलेली ही व्हिडीओ बिहारमधील सिव्हान जिल्ह्यातील आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमधून असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामध्ये लोक सेलिब्रेशनच्या निमित्ताने पिस्तुल घेऊन नाचत होते. या अशा कृत्यामुळे अनेकवेळा खूप गदारोळ देखील झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्येही असेच काहीसे पाहायला मिळत आहे. या धक्कादायक व्हिडीओमध्ये तुम्ही लाल रंगाचा लेहेंगा घातलेल्या एका महिलेचा डान्स पाहू शकता. डान्सरसोबत काही मुलेही स्टेजवर उभी आहेत. तर स्टेजच्या समोर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. डान्सरने पिस्तुल हातात घेऊन ठेका धरला आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
डांसर के हाथों में पिस्टल थमा कर युवक मस्ती में ऐसे डांस कर रहा हैं, जैसे इसको पुलिस प्रशासन का खौफ ही नहीं... VIDEO सीवान का है... @BJP4Biharpic.twitter.com/0ucjXesl8T
— Nitesh Srivastava (@nitesh_sriv) September 30, 2022
हातात पिस्तुल घेऊन केला डान्स
आता हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या फ्लॅटफॉर्मवर व्हायरल केला जात आहे. या प्रकाराबद्दल नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत असून आयोजकांवर कारवाईची मागणी होत आहे. मात्र याप्रकरणी काही कारवाई झाली की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. यामध्ये दोन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.