ऐकावं ते नवलच! दारूच्या नशेत होर्डिंगला जाऊन लटकला; video viral होताच झाली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 03:48 PM2023-01-13T15:48:53+5:302023-01-13T15:49:39+5:30

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही.

A video of a drunken youth hanging from a hoarding in Telangana's Siddipet area is going viral  | ऐकावं ते नवलच! दारूच्या नशेत होर्डिंगला जाऊन लटकला; video viral होताच झाली कारवाई

ऐकावं ते नवलच! दारूच्या नशेत होर्डिंगला जाऊन लटकला; video viral होताच झाली कारवाई

googlenewsNext

नवी दिल्ली : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण प्रसिद्धीच्या झोतात येत असतात. सध्या असाच एक मद्यपी तरूण प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. खरं तर तेलंगणातील सिद्धीपेट भागात गुरुवारी सोशल मीडियावर 'जाहिरातीच्या होर्डिंगला लटकलेल्या व्यक्तीचा' व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, ही घटना बुधवारी घडली असल्याचे बोलले जात आहे. जाहीरातीच्या होर्डिंगवर लटकलेल्या या मद्यपी तरूणामुळे सिद्धीपेठ परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली. या तरूणाला पाहण्यासाठी स्थानिकांनी एकच गर्दी केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत होता, त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

video viral होताच कारवाई  
सिद्धीपेठचे पोलीस आयुक्त एन. श्वेता यांनी म्हटले, "संबंधित व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत होता. ही घटना सायंकाळच्या सुमारास घडली. तो पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता. त्याला खाली उतरवण्यात आले आणि त्याच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आले. आम्ही घटनेची नोंद केली असून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ निर्माण केल्याबद्दल त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: A video of a drunken youth hanging from a hoarding in Telangana's Siddipet area is going viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.